दिनांक १७.१२.२०२३ रविवार या दिवशी पंढरपूर येथील जुन्या बस स्टॅन्ड समोरील हॉटेल विठ्ठल इन मध्ये मान्यवरांना पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यामध्ये संपादक अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण, बहुजन मित्र यांना पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. आठवले हे आपल्या वृत्तपत्रातून सडेतोड, निर्भीड, जे दिसेल तेच लिहत असतात, त्यांची जहालवादी, मवाळवादी म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. पुरस्काराचे स्वरूप, भारताचे संविधान, सन्मान पत्र, हार, शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था काढून गोर-गरिबांच्या मुलाने शिकून मोठे व्हावे, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हि तळमळ होती. त्याच रयत शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय पंढरपूर, पूर्वीचे पंढरपूर कॉलेज पंढरपूर ते आजचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यामध्ये शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाले. उच्च शिक्षण घेतले आणि या रयत शिक्षण संस्थाचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील समाज भूषण पुरस्काराने मला सन्मानित केले. माझे जीवन आनंदीमय झाले, जीवनाचे सार्थक झाले, या पुरस्काराने बळ मिळाले, स्पुर्ती मिळाली.
हा पुरस्कार सन्मान प्रा.बाबासाहेब कोरडे सर, मा.अशोक अगावणे सर, प्रगल्भ विद्यार्थी विचार मंच, महाराष्ट्र राज्य, समन्व्यक मा.रमेश सावंत सर, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, भालचंद्र कांबळे सर, प्रा.जेष्ठ विचारवंत अनिल गायकवाड सर, सामाजिक कार्यकर्ते गौतम साबळे, पेनाच्या टोकावर पुस्तकाचे लेखक जेष्ठ विचारवंत मा.बी.आर भोसले सर व इत्यादिंच्या उपस्थितीत पुरस्कार दिला गेला. अभिमन्यू आठवले यांचे सर्वच स्थरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१