Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफ करावीत यासाठी महाराष्ट शासनाने दखल घ्यावी

संपादक       

    लॉकडाऊन च्या काळातील विज वितरण कार्यालयाकडून आलेले बिले ते दुपटी तिपटीने वाढीव आले आहेत त्यामुळे जनतेवर विज वितरण कंपनीची ही हुकुमशाही म्हणावी लागेल. लॉकडाऊनमुळे कमधंदे करता आले नाहीत, शासनाने बाहेर पडू नका असे आदेश काढले, बाहेर पडाल तर गुन्हे दाखल करू असे सांगितले. कोरोना कोव्हिड -१९ हा जीव घेणारा रोग आहे. त्यामध्ये घरगुती, व्यवसाईक बिलांमध्ये भरमसाठ वाढ करून बिले ग्राहकांना पाठविले आहेत त्यामुळे ग्राहकावरती हा विज वितरण कंपनीचा अन्याय आहे. कुठून बिले भरायची हा प्रश्न ग्राहका पुढे उभा राहिला आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.नितिन जी राऊत साहेब यांना लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफ करावी असे ट्वीटरद्वारे ट्वीट आठवले यांनी केले आहे परंतु त्याला ऊर्जामंत्री यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे आलेल्या विज बिलाचे करायचे काय? वीज बिल भरणे ग्राहकांना शक्य नाही. लॉकडाऊन च्या काळातील विज बिले माफच केली पाहिजेत. शासनाने घराबाहेर पडू नका कोरोना या रोगाच्या काळात आदेश काढले तसेच आदेश महाराष्ट्र शासनाने जनतेने लॉकडाऊन च्या काळातील विज बिल भरू नये असे आदेश काढावेत व विज बिले माफ करावीत यामुळे जनतेला शासनाचा आधार होईल असे झाले नाहीतर जनता त्रस्त झाली आहे, काम धंदा नाही, पोटाला अन्न नाही, उपासमारी चालू आहे. त्यामध्ये विज वितरण कंपनीची जीवघेणे बिले देण्यात आली आहेत. सध्या पेट्रोल डिझेल ची दरवाढ वाढत असताना आता विज बिले ही ग्राहकांना आत्महत्या करण्यासाठीच कारण ठरतील असे वाटू लागले आहे. मागील सरकारने जे जनतेबाबत केले आणि आता हे सरकार त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन जनतेला होरपाळून काढत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? लॉकडाऊन च्या काळातील रीडिंग घेणे बंद ठेवले होते मग विज बिले का घेता? मागील बिलावरून सरासरी बिले काढली आहेत असे विज वितरण कंपनीचे अधिकारी सांगतात. तरी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातील विज बिले माफ करावी ही विनंती आहे.

 जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

 

 


Comments

  1. एकदम रास्त म्हणने आहे.मध्यमवर्गीय मधल्या मधे भरडला गेलाय.समाजातील ईज्जत भीक मागू देईना व सरकार अनुदान देईना.रोजगार माञ नाही.तोंड दाबून बूक्क्यांचा मार यालाच म्हणत असतील.
    सुनिल तेली फलटण.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...