Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

लोकनाट्य तमाशा मंडळ व थेटर चालक, मालक कला केंद्रातील कलावंतावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी

संपादक 

मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य व सर्व मंत्री

यांना सविनय सादर

          महाराष्ट्रातील नामवंत लोकनाट्य तमाशा मंडळ तसेच कला केंद्र असून याचे मालक व कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन लोकनाट्य तमाशा मंडळांना, नामवंतांना आर्थिक मदत देत होते ती मदत बंद झालेचे मालक सांगतात. कला ही महाराष्ट्राची शान आहे. कलाकारामुळेच तर आपल्या जीवनात आनंद मिळत असतो. त्याच कलाकारांच्या या कोरोना कोव्हिड -19 या रोगामुळे त्यांचे उपजीविकेचे साधन बंद झाले. आपली कला दाखवून ते उदरनिर्वाह करत होते. आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लोकनाट्य तमाशा मंडळ व थेटर कला केंद्र मालक व चालक यांना  सुरू करण्यास शासन मान्यता देत नाही. आज कलाकारांना दुसरे कोणतेच काम करता येत नाही. आयुष्य त्यांचे कला सादर करण्यातच गेले आहे त्यामुळे आता उतरत्या वयात काय काम करायचे? कसे जगायचे ? हा कलाकारापुढे गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. तमाशा मंडळ व कला केंद्रातील चालक व मालक यांचापुढे कलाकारांचे करायचे काय? त्यांनी आपले जीवन तमाशात व कलाकेंद्रात कलाकार म्हणून घालवले आहे. तमाशा मंडळ तसेच कला केंद्र चालू करण्यास परवानगी शासनाने दिली नाही तर या कलाकारांचे कसे होणार? हे कार्यक्रम गर्दीतील असतात. जेवढे प्रेक्षक जास्त तेवढा फायदा मालकाला, चालकाला असतो अशावेळी तमाशा मंडळ व कला केंद्र महाराष्ट्र सरकारने नियम व अटी घालून चालू करण्यास परवानगी दिली तर या कलाकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. या कार्यक्रमाच्या ठिकाणी एखादा कोरोना रोगाचा रुग्ण आला तर तो रुग्ण सर्वांना घायाळ करील अशी परिस्थिति असू शकते हा गंभीर प्रश्न उभा आहे. तरी शासनाने दर महा भरीव अशी मानधन योजना आयुष्यासाठी कलाकारांना चालू करावी, त्यांना आधार द्यावा, कलाकारांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने कटिबद्ध राहावे. प्रत्येक व्यक्तीला आनंद, मनोरंजन देणारे दैवत कलाकार आहेत त्यांना बेघर करू नये. त्याचप्रमाणे लोकनाट्य तमाशा मंडळ व कला केंद्राच्या चालक व मालकांना कलाकाराच्या कलेनुसार आर्थिक  (उचल) द्यावी लागते. लोकनाट्य तमाशा मंडळ व थेटर कला केंद्र चालक, मालक यांच्या समोर गंभीर प्रश्न उभा आहे. या कलाकारांच्या व्यथा वेदना काही कलाकारांनी सांगितल्या त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी.  

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...