Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

मा. शरद पवार साहेब हे देशासाठी व महाराष्ट्रातील जनतेसाठी वरदान आहेत त्यांचा आदर केला गेला पाहिजे


संपादक

          मा. श्री. शरद पवार साहेब यांच्यावरती भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा दिली आहे ती चीड आणणारी आहे, ती वेदनादायी आहे. पवार साहेब कोरोना आहेत असे म्हणणे तुमचे असेल तर याची लागण झाली तर आयुष्यभर क्वारंटाईन व्हावे लागेल आणि जगातील कोणतेही शास्त्रज्ञ  व डॉक्टर यांचा इलाज चालणार नाही हे पडळकरांनी लक्षात घेतले पाहिजे. पवार साहेब या भारत मातेचे सुपुत्र आहेत त्यांचा सल्ला, मार्गदर्शन असंख्य नेते घेत आहेत. पवार साहेब मातेचे सोने करणारे आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे बोलून प्रसिद्धी मिळावी या हेतूने बोलणे महागात पडेल. पवार साहेब हे देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे कल्याणकारी नेते आहेत. त्यांच्यावर उपमा म्हणजे तमाम देशातील जनतेवरील उपमा हे पडळकरांनी लक्षात घ्यावे. स्वत:चे सामाजिक काम काय आहे हे तपासून पहावे. सध्याच्या काळात कोरोना या रोगाने जग घायाळ केले आहे मग पवार साहेबांना कोरोना या रोगाची उपमा देऊन काय साध्य झाले? तुम्हालाही घायाळ केल्याशिवाय सोडणार नाही. पवार साहेबांचा सामाजिक, राजकीय प्रवास एवढा मोठा आहे की त्यांची कामगिरी मोजण्याचा टेप अजून निघाला नाही. त्यांचा नकाशा बनू शकतो एवढी महान कामगिरी आहे. पवार साहेबांना कोरोना म्हणून हिनवून  पडळकरांनी चूक केली आहे. आमदार झाला म्हणून जग जिंकले असे होत नाही. पडळकरांचे काम म्हणजे बारामती येथून अजितदादा पवार साहेब यांच्या विरोधात निवडणूक लढविली व डीपोझिट जप्त झाले या पलिकेड काय आहे? वंचित बहुजन आघाडीला ही राम राम केला. पडळकर बहुजणांचे नेते होऊच शकत नाहीत हे लक्षात घ्यावे. पवार साहेबांना कोरोना म्हणून हिणवले आहे म्हणून ते लहान होत नाहीत ते श्रेष्ट ठरत आहेत परंतु ज्यांनी हिणवले त्यांचे भविष्य यापुढे कसे असेल हा येणारा काळच सांगेल. प्रत्येकांनी शब्द हा जपून वापरला पाहिजे नाहीतर भडका आणि जाळ होणारच त्याची उष्णता हैराण करणारच. पवार साहेब हे देशासाठी व देशातील जनतेसाठी वरदान आहेत. पवार साहेब असे शास्त्रज्ञ आहेत की त्यांचा अजून कोणाला अंदाज आला नाही. त्यांच्यावरती खालच्या पातळीत येऊन जी उपमा पडळकरांनी दिली ती योग्य नाही ती निंदनीय आहे. पडळकर तुमचा सात बारा उतारा साहेबांकडे आहे. प्रसिद्धीसाठी उपमा उपयोगाची नाही हे लक्षात घ्यावे. तुम्हाला आमदारकी मिळाली हे नसीब समजून वागावे. थोरामोठ्यांचे काम काय आहे याचा अभ्यास करून बोलावे. पवार साहेबांपुढे तेल लावलेल्या पहिलवानांचे काहीही चालत नाही. पडळकर तुम्ही स्वत:कडे बघा आमदारकीच्या तोर्‍यात राहू नका. आमदारकी आज आहे उद्या नाही हे लक्षात घेऊन बोला म्हणजे झाले. आमदारकी आली म्हणजे छाती फुगते पन आमदारकी गेल्यानंतर छाती आत जाते हे ही  असंख्य आमदार पाहिले आहेत. पवार साहेबांचा आदर करायला शिका हीच अपेक्षा.

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

             


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...