संपादक
जगाच्या पाठीवर एक देश म्हणजे भारत आणि या देशाला जगाच्या पाठीवर “भारतमाता” म्हटले आहे. या भारत भूमीच्या रक्षणासाठी आमचे भारतीय जवान स्वत: चा, आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले, नातेवाईक याचा विचार न करता या भारत देशासाठी व या देशातील जनतेसाठी अहोरात्र खडा पहारा देत आहेत. आमचे जवान हे बहादुर आहेत. जो कोणी देशावर चालून येईल त्याची “टराटरा” फाडल्याशिवाय राहणार नाहीत. भारत देशाचे हे जवान सुपुत्र आहेत ते रणांगणात शत्रूचा सामना करण्यासाठी झुंजर वृत्ती डोळ्यासमोर ठेऊन झुंज देत असतात. आमचे भारतीय बांधव रणांगणात लढून धारातिर्थी पडतील पण मागे हटणार नाहीत या जवानांच्या पाठीमागे संपूर्ण देश व देशातील जनता यांचा आशीर्वाद त्यांना आहे. ते जवान आमचे सर्वांचे शूरवीर आहेत. ताणून ताणून शत्रूला ठोकणारे आहेत. देशासाठी सीमेवर लढाईचे तर निधड्या छातीने लढतील आणि गिधाडांची वाट लावतील. आमचे भारतीय जवान हे देशातील शान आणि भूषण आहेत. आमचे जवान हे वार झेलणारे आहेत, शत्रूंचा नायनाट करणारे आहेत, शत्रूंना देशोधडीला लावणारे आहेत. जे देशावर हल्ला करतील तर त्यांचा हिशोब वजाबाकी करून आमचे जवान येतील ही आमच्या जवानांमध्ये तेवढी हिम्मत आहे. सध्या चीनी या देशाने चालवलेले युद्ध परिस्थिति त्यांचा बिमोड केल्याशिवाय आमचे बहादुर जवान गप्प राहणार नाहीत. जो कोणी आमच्या भारत देशाच्या नादाला लागेल त्याला त्याच्याच सीमेत आमचे जवान गाढतील ही आमच्या भारतीय जवानाची बहादुरी व कर्तबगारी आहे. देशासाठी वीर मरण पतकरतील पण मागे हटणारे नाहीत. शत्रूला झुकवणारे आहेत, शत्रूला नामशेष करणारे आहेत, शत्रूला गुडघ्यावर आणणारे आहेत. आमच्या भारतीय जवानांच्या डोळ्यासमोर फक्त देश आणि देशातील जनतेचे रक्षण हेच ध्येय उद्दीष्ट असते. शत्रू राडा करतील तर तेथेचे आमचे जवान शत्रूला गाढतील हे हल्ला करणार्या औलादिने लक्षात घ्यावे. देशासाठी लढणार्या माझ्या भारतीय जवानांना मानाचा मुजरा...! जय हिंद !
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार

Comments
Post a Comment