Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

“जातीचा विटाळ” हा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही


        महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा व साधू संतांचा आहे. हा सर्व धर्माचा महाराष्ट्र आहे असे असताना जाणूनबुजून अनुसूचीत जाती जमातीचा तिरस्कार समाजकंटक करीत आहेत हे प्रमाण ग्रामीण भागात मोठया प्रमाणात दिसून येत आहे. समाजकंटकांनो तुम्हाला येवढा जातीचा का गर्व आहे ? तुमच्या आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांच्या रक्तामध्ये काय फरक आहे ? जातिनुसार रक्त रंगीबेरंगी आहे काय ? आपण २१ व्या शतकाकडे चाललो आहे. तरी समाजकंटकाच्या मनातील जात अजून गेली नाही ही शोकांतिका आहे. अनुसूचीत जाती जमाती विषयी विटाळ का होतो? तुम्हालाही धर्म जात आहे मग मला प्रश्न पडतो की, जातीचा ७/१२, खाते उतारा समाजकंटकाकडे आहे का? जातीचा नकाशा आहे का? जाती धर्मानुसार रक्ताचे रंग वेगवेगळे आहेत का? मग समाजकंटकांनो असे तर नाही ना? तरीपण स्वत: च्या जातीचा गर्व आणि अनुसूचीत जाती जमातीच्या लोकांचा तिरस्कार, अपमान, द्वेष, भेदभाव कशासाठी? प्रत्येक जाती जमातीचा धर्माचा मिळून गावी शहरे वसलेली असतात. अनुसूचीत जाती जमातीचे सध्याच्या काळात भक्षण केले जाते आहे. त्यांच्यावरती मोठ्या प्रमानात अन्याय अत्याचार होत आहेत याला फक्त “जात” या नावाची लागण पिढ्यान पिढ्या वंशावळी प्रमाणे येत असलेली जात यामध्ये लाज वाटायचे कारण काय? धर्म जात त्याचा स्वीकार केला पाहिजे. अभिमान बाळगला पाहिजे मग अनुसूचीत जाती जमाती बाबतच्या लोकांविषयी, विटाळ, तिरस्कार, अपमान, द्वेष, भेदभाव का? प्रत्येक व्यवहार सर्व जातीधर्माच्या व्यक्तीवर अवलंबून आहेत मग रोटीबेटी व्यवहार का नको? त्याचाच का विटाळ? विरोध कशासाठी? माणुसकीचा छळ होत असेल तर “अॅट्रोसिटी अॅक्ट” हे अनुसूचीत जाती जमातीचे रक्षण करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी कवच आहे. समाजकंटकांनो तुम्ही जबाबदार आहात हा कायदा लावून घेण्यासाठी हे लक्ष्यात घ्या. तुम्ही माणुसकी जपा यामध्ये सर्व काही आहे. समाजकंटकांनो हे वागणे बरे नाही. आपण माणूस म्हणून एकत्र जगूया. आज आमच्या अनुसूचीत जाती जमातीच्या बांधवांचे मर्डर केले जातात, हल्ले होत आहेत ही आमच्यासाठी चीड आणणारी आहेत. कारण या मागचे आम्ही एकसंघ नाही परंतु यापुढे अनुसूचीत जाती जमातीतील व्यक्तीने एकत्र यावे लागेल. जस्यास तसे उत्तर द्यावे लागेल. प्रत्येक जाती धर्मात फरक आहे. मग रक्तात फरक आहे का? मग कशासाठी वाद विवाद ? माणुसकी जपली पाहिजे. अनुसूचीत जाती जमातीचा तिरस्कार, विटाळ कशासाठी करता? आपण सगळे गुण्या गोविंदाने जेथे असेल तेथे राहू सर्व मनातील मतभेद काढून टाकू अशी मानसिकता असली पाहिजे इतकेच.

शोधपत्रकारिता

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...