Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

कै. सुरेश (दादा) ठोंबरे म्हणजे नातेपुते गावचे भूषण

लोकनेते कै. सुरेश (दादा) ठोंबरे  


संपादक

              कै. सुरेश (दादा) ठोंबरे हे नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर येथील लोकप्रिय असलेले नेते होते. सुरेश (दादा) ठोंबरे म्हणजे दिलेला शब्द पाळणारे, कर्तव्यात कसूर न करणारे, एक धाडशी व्यक्तिमत्व. राजकीय जीवनाची सुरुवात नातेपुते येथून शिवसेना शाखा प्रमुख म्हणून वयाच्या २१ व्या वर्षापासून झाली तेथून पुढे वाटचाल म्हणजे नातेपुते गावचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिति सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास होता. कै. सुरेश (दादा) ठोंबरे हे मनाने मोठे होते. त्यांच्याजवळ दयाळूपणा होता. एक व्यवसायातील अभ्यासू वृत्तीचे होते. त्याचप्रमाणे दरारा असा स्वभाव होता परंतु कधीही कोनावरतीही अन्याय केलेला आढळून आलेला नाही त्यांच्याकडून न्याय देण्यासाठीच राजकीय पदाचा वापर केला गेला. शासनाचा विविध योजना जनतेला मिळाल्या पाहिजेत यासाठी पंचायत समिति तसेच जिल्हा परिषद सदस्य असताना प्रयत्न केले. गोरगरीबांना विविध योजनेचा लाभ मिळवून दिला.

                  आज  कै. सुरेश (दादा) ठोंबरे यांची जयंती दरवर्षी ५ जून ला असते असे असताना कै. सुरेश (दादा) ठोंबरे यांच्या नावाने मा. श्री.संदीप (दादा) चंद्रकांत ठोंबरे यांनी कै. सुरेश (दादा) ठोंबरे विचार मंचाची स्थापना केली आज १२ वर्षे झाली. या विचारमंचाच्या माध्यमातून संदीप (दादा ) ठोंबरे यांनी ५ वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले. यावेळी १००० व्यक्तींनी रक्तदान केले, दुष्काळाच्या काळात टँकर ने पाणी वाटप केले, पानपोई उघडल्या, दुष्काळाच्या काळात जनावरांना मोफत चारा वाटप करण्यात आला. कोल्हापूर सांगली पुर ग्रस्थांना जीवनावशक वस्तु वाटप करण्यात आल्या. सध्या कोरोना या रोगाच्या काळात १०० लोकांना किट वाटप केले, ५०० लोकांना मास्क वाटप करण्यात आले, १००० लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले अशा प्रकारे कै. सुरेश (दादा) ठोंबरे विचारमंचाच्या वतीने सामाजिक कार्य चालू आहे. आज ०५ जून कै. सुरेश (दादा) ठोंबरे यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमत्त विनम्र अभिवादन...! 


अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक :  मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१      

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...