Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

अन्याया विरोधात लढा देण्यासाठीच बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटनेची स्थापना


 संस्थापक/संपादक पत्रकार 

मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 


संपादक

          आजपर्यंत विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. आता स्वता: ची सामाजिक संघटना उभी करून बहुजन समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून त्यांच्यावर होणारे अन्याय निवारण करण्याचा संकल्प केला आहे. बहुजनांना न्याय देण्यासाठीच १ मे २०१३ रोजी बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य ) स्थापून त्याचे कार्य महाराष्ट्रभर सुरू करीत आहे. ही बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना सर्व समाज्याच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना असल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यु बी. आठवले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मूलमंत्र ध्यानात घेऊन बहुजन सामाजाच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे काम करणार आहे. ह्या संघटनेला स्थापन होऊन ७ वर्ष होत आहेत यशस्वी घोडदौड चालू आहे व विविध प्रश्न सोडवण्या साठी कटिबद्ध संघटना असेल.

          संघटनेची ध्येय व उद्दिष्टे पुढील प्रमाणे

  • बेघर, बेसहारा अशा वाळवंटरूपी वादळामध्ये भरकटलेल्या पदवीधर बेकरांचे प्रश्न सोडविणे.
  • शेतमजूर, लहूउद्योग केंद्र, शासकीय बँका, समाजकल्याण मधील विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.
  • गाव पातळीवरील जनतेचे प्रश्न सोडविणे, ग्रामीण भागातील सावकारी बाबत आवाज उठविणे.
  • राजकीय वर्चस्वाखाली कर्मचार्‍यांवर होणारे अन्याय दूर करणे.
  • महिलांवरील अन्यायाविरोधात लढा देणे.
  • पोलिस कर्मचार्‍यांना राहण्यसाठी शासकीय वसाहती बांधण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविणे.
  • मटका, दारूधंदे  इ. अवैध चालणारे धंदे बंद करणेसाठी शासकीय कारवाई होणेसाठी लढा देणे.
  • जिल्हा परिषद, पंचायत समिति इ. मधील प्रलंबित कामे त्वरित होण्यासाठी पाठपुरावा करणे.
  • पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण, महसूल खाते, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, कृषि खाते यामधील शेतकर्‍यांचे व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणे.
  • पत्रकारांसाठी स्वतंत्र कार्यालय व त्यांचेवरील हल्याबाबत आवाज उठविणे.
  • आरोग्य खाते , शिक्षण खाते, यामधील कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासाविरोधात आवाज उठविणे.
  • सर्व प्रकारचे मागासवर्गीयांच्या मुलांच्या प्रलंबित स्कॉलरशिप मिळणेसाठी लढा देणे.
  • विविध क्षेत्रात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणे, विविध सामाजिक प्रश्न सोडविणे.
  • ग्रामीण असो व शहरी भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी लढा उभारणे.
  • रेशन दुकानातील भ्रष्टाचाराला आळा बसविणे.
  • तहसील कचेरीतील योजना गोरगरिबांना मिळवून देणे.
  • ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचारा बाबत आवाज उठविणे.
  • अनुसूचीत जाती जमाती मधील कुटुंब ग्रामपंचायत गावठांमध्ये अनेक वर्ष राहत असताना ग्रामपंचायत ठराव करीत नाही आशांवरती गुन्हे दाखल करणे.

या उद्दिष्टाप्रमाणे बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य ) सदैव तत्पर असेल.

टीप : संघटनेचे सभासद करून घेणे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख यांची मुलाखत घेऊन नियुक्ती करणे. इच्छुकांनी संपर्क साधावा.

संपर्क : ९४२०३०२५६१

संघटनेचे वृत्तपत्र साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र आहे.

मा. श्री. वैभव अ. आठवले संघटक ( महाराष्ट्र राज्य ) ८६०००६७०७४

उपसंपादक / पत्रकार


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...