Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

कोरोना कोव्हिड -१९ या रोगाच्या काळात देव सुद्धा झाले “पालापाचोळा”

संपादक

कोरोना कोव्हिड – १९ या रोगाने जगावर दहशत पसरवली. जगातील देश, राज्य, जिल्हे, तालुके, गावे ओसाड पडली. कोरोना हा रोग नुकसानीचा रोग ठरला, या रोगाने माणुसकी मारली, नात संपविल, कोणीही कोणाचं नाही, आला एकटा चालला एकटा, येताना काही घेऊन आला जाताना काय घेऊन चालला मिळालेल्या आयुष्याची मूठभर राख या पलिकडे माणसाचे काय अस्तित्व आहे. जेथे माणसाचे अस्तित्व नाही तेथे देवाचे तरी काय अस्तित्व राहणार? कोरोना या रोगाच्या संकट समयी देवालाच कोंडून ठेवले आहे. जर देव खरे असतील तर भक्तासाठी देव अशा संकटाला पळवून लावतील परंतु तसे देवाने केले नाही. भक्तांनी भरभरून देवासाठी भक्ति करायची, दान धर्म करायचा, देवाची देवालयाच्या इमारती मजल्यावर मजले चढवायचे, सोने, चांदी, पैसे अशी मदत (दान) देवाला संकट घालविल म्हणून सढळ हाताने भक्त देतात त्याच भक्तांना देवाने कोरोना कोव्हिड -१९ च्या काळात वार्‍यावरती सोडले. देवा कोरोना सारख्या रोगाचे संकट तू घालवले पाहिजे होते पण तू खरा नाही खोटा आहे हे सिद्ध झाले आहे. भक्त देवा तुज्यावरती भावनेमुळे तुझा आदर करतात पण तुझ्यात संकट निवारण करण्याची क्षमता, हिम्मत नाही हे या रोगाच्या काळात दिसून आले आहे. भक्त देवाचे भुकेलेले असतात मात्र देव भक्तांचे नसतात हे बघायला मिळाले. तू भक्तांचे संकट दूर करणारा नाही तर तुझे जे पुजारी आहेत त्यांना चहू बाजूंनी मोठे करणारा तू आहेस. देवा तुझी कुठे गेली शक्ति? कोरोना या रोगाचे संकट असताना ऐष आरामात बंद देवळात मजेत राहिला आहेस. तू जर खरा असला असता तर बंद केलेले दरवाजे, कुलपे तोडून टाकले असते पण तुझ्या शक्तीचा, भक्तीचा तुला अंदाज नाही. तूच ढोंगी आहेस तुझ्या नावामुळे भक्त सुद्धा आंधळे झाले आहेत. भक्ताची आंधळी माया तुझा जयजयकार करते. देवा तुझाच आता पालापाचोळा झाला आहे. तू या कोरोना कोव्हिड – १९ च्या या रोगाच्या काळात संकट घालवले पाहिजे होते परंतु देवा तुझ्याकडून झाले नाही. तू आता रक्षणकर्ता राहिलेला नाही हेच सध्या दिसून आले आहे. काही समाजाने साधू संतांना छळले तेच आता त्या साधू संता बाबत काळजी घेत आहेत. हे आश्चर्य म्हणावे लागेल इतकेच.  

शोधपत्रकारिता

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

 

 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...