Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

जिजाऊ, सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे : राजकुमार हिवरकर-पाटील (शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख)

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले, एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री-पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याची दिसून येते. त्याचाच प्रत्येय म्हणून आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे, सून पण आहे, मुलगी पण आहे, स्वतः पण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही. जिजाऊंनी जर बलिदान दिल नसत तर स्वराज्य घडल नसत आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जर जाती-पातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केल नसत तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना भवनामध्ये  प्रवेश करताना दिसला नसता म्हणून आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे.

     तालुकाप्रमुख महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे म्हणाल्या, आज मला खर भाग्य माझ्या माता, माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेचे रणरागिनी म्हणून सहभागी होईन.

यावेळी अनेक महिलांना शिवसेनेची नियुक्तीपत्र देण्यात आली. दहिगाव महिला शाखाप्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार, सीमा अनिल कांबळे जिल्हा परिषद गट प्रमुख, राणी अनिल राणी-माने शाखा संघटक, रेशमा बेंद्रे उपशाखाप्रमुख, प्रणाली वेदपाठक तालुका उपप्रमुख, रूपाली कांबळे कार्यकारणी सदस्य, कोमल सरवदे कार्यकारणी सदस्य, रोहिणी सोनवणे दहिगाव कार्यकारणी सदस्य, श्रीमती विद्या भोसले सदस्य, अमृता सरवदे गोडसेवस्ती प्रमुख, सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख, ज्योती चिकणे उपशहर प्रमुख नातेपुते, अमृता सरवदे शाखाप्रमुख गोडसे वस्ती, माया ढेकळे शाखाप्रमुख गोडसे वस्ती, मनीषा माने कार्यकारी सदस्य, स्नेहा बोडरे कार्यकारणी सदस्य, सीमा आईवळे सदस्य, कार्यकारणी सदस्य दिपाली झेंडे, कार्यकारणी सदस्य साधना पावणे गोडसे वस्ती, कार्यकारणी सदस्य रंजना शेंडे, कार्यकारणी सदस्य धोंडाबाई ढेकळे, कार्यकारणी सदस्य अनिता सोनवणे, शहर संघटक नातेपुते अलका शेंडे, सदस्य सरस्वती शेंडे, सदस्य राणी माने शाखा संघटक दहिगाव, काजल झेंडे सदस्य, रोहिणी झेंडे सदस्य, कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडीची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिनींना देण्यात आली. 

शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या उपस्थितीत केला. यावेळी महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे, श्री.अविनाश सुरवसे, शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे, दहिगाव शहर प्रमुख विजय सरवदे, उपप्रमुख दत्ता बोडरे, नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे, भाजपचे मनोज जाधव, भाजपचे सुनील  बनकर, अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेने विषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून, हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे. यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केलं.


बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...