उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
२०२४ या कालावधीमध्ये होत असलेल्या सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातून मी अभिमन्यू आठवले, जातीने महार, सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे, दलित पँथर या संघटनेचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहे. AJFC या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहे. तसेच साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र या वृत्तपत्राचा संपादक-पत्रकार आहे.
अनेक वर्ष सडेतोड पत्रकारिता करीत आहे, बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचा संस्थापक आहे, निर्व्यसनी आहे, कायदयाचा अभ्यासक आहे, मी पदवीधर आहे. शिक्षण क्षेत्र याला राज्यकर्त्यांनी ग्रहण लावले आहे, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण सुरु केले आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुली संकटात सापडल्या आहेत. या मुलांना शिक्षण शाप ठरतय असे चित्र आहे. शिक्षणाचे खाजगीकरण होऊ नये यासाठी त्यास विरोध करण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या, तसेच बाहेर पडलेल्या मुला-मुलींनी आपले पवित्र मत मला द्यावे व मतदानाचा हक्क बजवावा. तुमचे एक मत आवाज आहे, मी सोलापूर लोकसभा मतदार संघातून निवडुन गेलो तर केंद्रात कोणाचेही सरकार राहू द्या त्या सरकारला मी एकटा विरोधक म्हणून भारी पडेन, लोकसेवक म्हणून आवाज उठवेन, तेवढी माझी अभयासूवृत्ती आहे. माझी उमेदवारी ही देश वाचावा, देशाचे संविधान वाचावे, देशातील शिक्षण संस्था वाचव्यात, देशात हुकूमशाही येता कामा नये, जनता होरपळता कामा नये, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला, पाहिजे अशा लाखो योजनाचा नकाशा जनतेच्या हितासाठी माझ्याकडे आहे.
मी देश चालवू शकतो एवढी बुद्धिमता माझ्याकडे आहे, मी स्वतःला कमी मानत नाही, तुम्ही वेढे समजाल. महत्वाकांक्ष असेल तर अशक्य काहीच नाही. वेडेपणा करणारेच इतिहास घडवू शकतात. मी अपक्ष उमेदवार आहे, मालदार नाही, तुमच्या कल्याणासाठी मी उभा आहे, मी मते खाण्यासाठी कोणत्याही पक्षाची सुपारी घेतली नाही. मी लढाऊ आहे, दलाल नाही. एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडुन आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी मी निवडणूक लढवीत नाही. माझ्यापुढे देश, संविधान, जनता वाचावी ही चिंता आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवीत आहे.
तरी सर्व शिक्षक, मतदानाचा हक्क असलेल्या मुला-मुलींनी मला मत द्यावे हि कळकळीची विनंती.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.