उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघात अपक्ष उमेदवार अभिमन्यू आठवले निवडणूक लढवीत असून मजलं दरमजलं करीत गेली तीन महिने सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, मध्य दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर अशा सहा मतदार संघात मतदार बांधवाच्या गाठी भेटी, संवाद साधतं आहेत. प्रचंड उन्हाचा तडखा असून ही मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करीत आहेत. कोणताही स्टंट न करता, जनतेच्या प्रश्न याला समाधान कारक उत्तरे देतात, अशी भूमिका बजावत आहेत.
अभिमन्यू आठवले हे कोणताही डाम दौल करीत नाही, प्रचंड साधेपणा, मनमिळाऊ आहेत. मतदार संघात मागून जेवण करतात असे असल्यामुळे मतदारांना आठवले विषयी आपलूकी निर्माण झाली आहे., ऐकला चलोरे असे असते. जमिनीवर पाय ठेऊन असलेला एक झुंझार सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख, कायद्याचा अभ्यासक, जनतेच्या अडिअडचणीची जाणीव, गरिबीचे चटके सोसले आहेत, शांतीत क्रांती करणारे आहेत. जवळपास दीड ते दोन लाख मते मतदार देतील असा विश्वास आहे. प्रत्येक गावात दगडा पेक्षा वीट मऊ असे मतदार बोलत आहेत व आठवले यांना मत देण्याचे ठरविले आहे.
तसेच बनवा बनवी करणारे, फेको पासून मतदारांनी सावध रहावे. देश व जनता संकटात आहे, शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल किंमत आहे, हमी भाव नाही, राज्यकर्ते यांनी उद्योग धंदे याची वाट लावली. मुले-मुली शिकून बेरोजगार पडले, सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. पहिले 'अच्छे दिन' आता ग्यारंटी असे बोलून पक्षाचे फेको मतदारांना भावनिक करतील. मतदारांनी फेको पासून सावध रहावे, आपले पवित्र मत मला द्यावे मी जातीने महार समाजाचा आहे. मी सर्व-धर्म समभाव वागतो. कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार केला नाही. राजकारण हे हिशोब मागण्यासाठी नसुन जनतेच्या गैरसोयी दूर करणे, गावांचा विकास करणे असे असते. खासदार, आमदार होण्याअगोदर जमीन जागा घरदार विकून कोणी विकास केला का? हे उमदेवार यांनी लक्षात घ्यावे. निवडणुकीत विकासावर बोलावे, मागील कोणत्या खासदार, आमदारांनी काय दिवे लावले, यावरती कोणाचे सरकार खाली कोणाचे सरकार हे सांगता कामा नये. मतदारांना कळते सोलापूर लोकसभा मतदार संघात खरी लढत काँग्रेस, भाजप व अपक्ष उमेदवार अभिमन्यू आठवले यांच्यात तिरंगी लढत असेल. मतदार हे देशाची शान आणि मान आहे. त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे माझे भाग्य समजतो आपला अपक्ष उमेदवार अभिमन्यू बी आठवले.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.