सोलापूर राखीव मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करावी यासाठी या राखीव मतदार संघात मोडणाऱ्या असंख्य मतदार बंधूनी आग्रह केला. मला कोणताही राजकीय वारसा नाही तसेच आर्थिक बाजू भक्कम नाही. एक झुंझार सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख महाराष्ट्र भर आहे. शासन दरबारी वचक आहे. कोणतेही पद नसताना मी जनतेच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी जागृत असतो.
संपादक पत्रकार म्हणून सडेतोड लिखाण करतो, अन्याया-विरोधी आवाज उठवितो, भीती माझ्या रक्तात नाही, दलाली कधी केली नाही, स्वाभिमानी आहे. मतदार हेच माझे दैवत आहे व माझी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका, गाव, शहर, या मधील मतदार बांधवांसोबत नाळ जोडली गेली आहे. खासदार, आमदार होऊन कामे तर करता येतील पण असे काहीही नसताना जनतेच्या अडिअडचणी सोडवित आहे.
या मतदार संघात तगडे, आर्थिक बाजू भक्कम असलेले आमदार त्यांच्या पार्टीतून निवडणूक लढवीत असले तरी त्यांच्यापुढे अभिमन्यू आठवले हे जड व घाम फोडणारे अभ्यासु उमेदवार आहेत. संविधानाने दिलेली लोकशाही टिकली पाहिजे, जनता सुखी असावी, शेतकरी राजा आनंदी असावा, शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळावे, शासन दरबारी अधिकारी मस्तवलेली आहेत त्यांचा माज मी उतरलेला आहे. तसेच या सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातील सकल मराठा मतदार बांधवानी मला आपले पवित्र मत दयावे, पाठिंबा द्यावा हि कळकळीची विनंती आहे.
तसेच या मतदार संघातील संपादक पत्रकार बांधवांनी आपला पत्रकार बांधव निवडणूक लढवीत आहे हे समजून मतदान करावे.
पत्रकारांना सुख सुविधा, हक्काचे घर, जागा मिळावी यासाठी माझी भूमिका राहील. सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघ मोठा आहे, आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी धडपडीत आहे, माझी आर्थिक बाजू नाजूक आहे आतापर्यंत निवडुन दिलेले उमेदवार पाच वर्षांनी हात जोडत येतील, भामटे बोलून मत मागतील याचाही विचार करा.
मी सोलापूर मतदार संघातील उमेदवार आहे, मी पदवीधर आहे, मला स्टंट बाजी करता येत नाही. मी संपादक पत्रकार आहे, तसेच बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक आहे. रॅलीमध्ये पैसे देऊन मतदार बोलवून, मेळावे घेणे, मताला पैशे देणे असे होत असते. मतदान पवित्र दान आहे ते विकु नका आदर राखा २०२४ हि लोकसभा निवडणूक देशासाठी व जनतेसाठी महत्वाची आहे. माझे नाव, चिन्ह, तुमचे लाखमोलाचे मत हेच माझे तारणहार आहे
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.