उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
अभिजित निर्मला भरत भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाली त्यानिमित्ताने शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार शिवरकर पाटील यांनी त्यांचा शिवसेना भावनावर सन्मान केला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यावर कोणीही गुरगुरणारच हा बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने अभिजीत याने शिक्षणाच्या माध्यमातून सार्थक करून दाखवला आई-वडिलांचे छत्र हरपल तरीही खचून न जाता शिक्षणाप्रती स्वतःला वाहून घेतलं त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत त्याला पोहोचता आलं मिळालेले यश हे समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करण्याकरता अर्पण केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचा विचार चा जागर होणार तु ज्या परिस्थितीतून अधिक शिकला त्याचा आदर्श एमपीसी यूपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अकलूज व गिरवी येथे अभ्यास करून कोणतेही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडी करून पास झाले. यामध्ये त्यांना २५१.५ गुण मिळवून त्यांना यश मिळाले आहे.
त्यांचे मूळ गाव सोनगाव आणि शिक्षण दहावी आर एस के माध्यमिक विद्यालय गिरवी (ता. माळशिरस) तर नातेपुते येथून १२ वी उत्तीर्ण होऊन बी. सी.ए. आणि एम. सी.ए अकलूजमधून उत्तीर्ण होऊन त्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास हा अकलूजमध्ये केला आहे. शिक्षण स्वतःच्या बळावर पूर्ण केले. त्यांच्या यशामध्ये मामा गौतम सावंत व बाळू सावंत व सावंत परिवार , तसेच API सोमनाथ कर्णवर साहेब, झुंझूर्डे साहेब, लांडगे साहेब महाराष्ट्र पोलीस, मित्र सचिन पांढरे, समाधान पांढरे, सिद्धनाथ हजारे, रमेश मस्के, अलताफ शेख, लक्ष्मण शिंदे(PSI)धिरज भोसले, रोहित राऊत, आकाश सावंत, आनंद सावंत, उमेश यादव, सलमान शेख व एम के स्पोर्टस् क्लब अकलूज चे संचालक माऊली कांबळे सर, गिरवी ग्रामपंचायत गिरवी व इतर पोलीस मित्र तसेच माळशिरस तालुका अधिकारी संघटना संचलित ज्ञानसेतु अभ्यासिका अकलूज व ज्ञानसाधना अभ्यासिका अकलूज यांचा महत्वाचा वाटा आहे. यावेळी शिवसेनेचे तालुक्याचे प्रमुख राजकुमार पाटील आनंद सावंत बोधिसत्व सावंत विजय सरवदे विजय ढेकळे प्रमोद चिकणे पोपट शिंदे संदेश बरडकरउपप्रमुख दत्ता बोडरे शिवाजी गाडे आधी शिवसैनिक उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.