उपसंपादक : वैभव आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण
क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची आज १९७ वी जयंतीनिमित्त फोंडशिरस येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कक्ष अधिकारी परीक्षेमध्ये गावची सुकन्या भाग्यश्री संजय शेंडे हिने उत्तुंग असे यश संपादन केले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
फोंडशिरसमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर-पाटील म्हणाले की, आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना खूप खूप कष्टाने आणि मेहनतीने शिकवले. त्यामुळे तमाम हिंदुस्थानातील स्त्री शिक्षण सुरू झाल आणि त्याचाच प्रत्यय म्हणून गावच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला दिसायला लागल्या आणि आज आपल्या गावची सुकन्या जनतेच्या सेवेसाठी सरकारच मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी पदावर नेमणूक झाली हा खरा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री फुले यांच्या विचाराचा विजय आहे.
यावेळी व्यासपीठावर फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे, माजी सरपंच संपत ढोपे, सावता ढोपे, पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, तात्याबा बोराटे, सावता बोराटे, लक्ष्मण जाधव, विजय पाटील, नानासाहेब शेंडे, भाजपा युवा नेते मनोज जाधव, युवा नेते तेजस गोरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे दत्तात्रय गोरे, आध्यात्मिक गुरु बाळासाहेब गोरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोरे, संजय जी शेंडे, सतीश आप्पा बरडकर, सुनील गोरे, तेजस गोरे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, फोंडशिरस गावचे आजी-माजी सरपंच, सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थ, माता-भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.