उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
विकासाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. शिवसेना महायुतीमध्ये लढत आहे. शिवसेनेचा उमेदवार म्हणून हिवरकर-पाटलांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा तसेच येणाऱ्या अन्य निवडणुकांमध्ये शिवसेना काम करेल असे प्रतिपादन शिवसेनेचे सचिव व संपर्क नेते संजय माशीलकर यांनी शिवसेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी नातेपुते येथील शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
पुढे बोलताना माशीलकर म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री समाजाप्रती काम करीत आहेत. जनतेप्रती असलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत शिवसेना पोहोचवीत आहोत. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. राजकुमार हिवरकरांचे आरोग्य विषयातील काम खूप मोठे आहे. सामाजिक क्षेत्रातील शिवसेनेच्या सक्रिय सहभागामुळे महिला पुरुष विद्यार्थी यांना न्याय मिळत असे चित्र पाहावयास मिळाले. काही उणीवा असतील तर त्या दूर करू. यावेळी शिवसेनेचे संपर्क सोलापूर लोकसभेचे संपर्कप्रमुख महेश साठे, सोलापूर लोकसभेचे जिल्हाप्रमुख चरण चवरे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रदर्शन साठे, युवती सेना जिल्हाप्रमुख रेवती पराडे, जिल्हा संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा माळगे ताई, शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील, महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई, सर सुरवसे, शिवसेनेचे संतोषजी गोरे, तालुका उपप्रमुख महिला प्रणिता वेदपाठक, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे, शहर प्रमुख पोपटराव शिंदे, दहिगाव शाखाप्रमुख विजय सरवदे, अलंकापुरी शाखाप्रमुख विजय ढेकळे, प्रभाग ७ चे शाखाप्रमुख सनी बरडकर, प्रभाग १३ प्रमुख सोनू लांडगे, प्रभाग १४ चे प्रमुख राजू मुलाणी आदी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व जवळपास ५०० शिवसैनिक व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.