उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब DHO नवले साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते साहेब विद्यमान तालुका वैद्यकीय अधिकारी शिंदे मॅडम शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये शंभू महादेव कावड यात्रेनिमित्त ठिकठिकाणी फिरते दवाखाने निर्माण करण्यात आले आहेत त्याचा लाभ पायी चालत येणाऱ्या असंख्य शिवभक्तांना होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक माळशिरस तालुका असल्याने शिखर शिंगणापूर येथे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश इंदोर गुजरात येथून शिवभक्त शिखर शिंगणापूरला येत असतात बहुतांश भाविक हे पायी चालत येत असतात ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांसह कुटुंबांसह पाई प्रवास करीत असतात प्रवासात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन फिरते दवाखाने चालू करण्याची संकल्पना पुढे आली त्या माध्यमातून शिवभक्तांमध्ये अबूतपूर्व आनंदाचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे.
ओ आर एस च्या पुड्या गोळ्या औषध देऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सिरीयस असल्यास त्यांना ॲम्बुलन्स द्वारे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे असा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आता अभूतपूर्व अशा शिवभक्तांच्या सेवेसाठी पूर्ण माळशिरस तालुक्यातील आरोग्य सेवा, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये सौ.चव्हाण सिस्टर, डॉक्टर करूळे, डॉक्टर इवरे, डॉक्टर सावंत, mpw, जीएस काशीद आजीना बागवान, माया चव्हाण, आशा सेविका आधी परिश्रम घेत आहेत. यांच्या विजय सरवदे शाखाप्रमुख दहिगाव दत्ता बोडरे, शाखा उपप्रमुख दहिगाव प्रमोद चिकणे, तालुका उपप्रमुख पोपटराव शिंदे, शहर प्रमुख विजय ढेकळे, अलंकापुरी शाखाप्रमुख संतोष गोरे, तालुका उपप्रमुख व शिवसैनिक तालुक्यातील आरोग्याचे कर्मचारी योगदान देत आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
https://bahujanbhushan.blogspot.com/2024/04/blog-post_18.html