Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुते पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची आदर्श कामगिरी

उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

     नातेपुते पोलीस ठाणे येथे दि.२५/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे. अभिनंदन अरविंद दोशी राहणार नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे हजर होऊन तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल MH 45 B 1117 हिरो होंडा कंपनीची सीडी डाऊन २५०००/- (पंचवीस हजार रुपये) किमतीची अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली. दिनांक १८/०३/२०२४ रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 99/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते. 

     तसेच १३/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे - सौ.कमल बाळासाहेब घनवट, राहणार-नातेपुते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील १०,०००/- (दहा हजार रुपये) किमतीचे दोन डोरले असलेले मंगळसूत्र कुणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2024 IPC 379 अन्वये आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याचा तपास पोलीस हवालदार 718 भगत हे करत होते.

     तसेच यापूर्वी दहिगाव चौक नातेपुते येथून १०,०००/- (दहा हजार रुपये) किमतीची मोटरसायकल चोरी झालेबाबत तक्रारदार नामे - दशरथ सिद्धू शिंदे, राहणार दहिगाव यांची तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक  97/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

     वारंवारं होणाऱ्या मोटरसायकल चोरी बाबत, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग, श्री.नारायण शिरगावकर यांचे सूचना व मार्कदर्शनान्वये नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, पोलीस हवालदार धोत्रे, अमित भगत, अमोल वाघमोडे, नितीन तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल, रणजीत मदने, सोमनाथ मोहिते यांनी वरिष्ठांच्या प्राप्त सूचना मार्गदर्शन व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक व विश्लेषण करून 2 आरोपी यांचेकडून ०३ गुन्हे उघड झाले असून त्यामधील दोन मोटरसायकल व दोन डोरले असलेले मनी मंगळसूत्र असे एकूण किंमत ४५,०००/- (पंचेचाळीस हजार रुपये) किमतीचा चोरीतील मुद्देमाल आरोपी यास अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रीमांडमध्ये असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.

     नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविषयी गुन्हे घडू नये यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आलेले आहे.

     त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. 

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...