संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माळशिरस तालुक्यामध्ये ४ नगरपंचायती आहेत. अकलूज,महाळुंग,माळशिरस,नातेपुते या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये स्वस्त धान्य दुकानांची संख्या अल्प आहे. पूर्वी या सगळ्या ग्रामपंचायती होत्या. नगरपंचायती हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, निराधार महिला अशांना स्वस्त धान्य दुकाने गावातील नगरपंचायत हद्दीतील प्रमुख ठिकाणी असल्याने पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून आणणे शक्य होत नाही किंवा आणायला जाताना साधन नसल्याने आणता येत नाही.प
परिणामी केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी मोफत दिलेले धान्य सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे नागरिकांना योजनांपासून वंचित रहावे लागते.
त्यासाठी प्रत्येक प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती करावी याबाबतचे निवेदन श्रीमती सीमा होळकर जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर व महाराष्ट्र यांना समक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना मेल द्वारे देण्यात आले आहे.
वरील निवेदनाबाबत तात्काळ लक्ष घालण्याचे आश्वासन श्रीमती सीमा होळकर यांनी दिले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.