उपसंपादक वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते येथील स.म. शंकराव मोहिते-पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.उत्तम सावंत सर यांचे चिरंजीव चि.सत्यजित ( एम.बी.ए.) व धानोरे येथील श्री.अशोक टिक यांची कन्या चि.सौ.का शेजल ( एम.एस. सी कॉम्प्युटर सायन्स) यांचा शिव विवाह नातेपुते येथील मधुर-मिलन मंगल कार्यालय येथे दिनांक १७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.
या विवाहाची वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही जन्मपत्रिका, मुहूर्त न पाहता, हुंडा न देता व न घेता दोन परिवारामध्ये आर्थिक नियोजन करून विवाह सोहळा पार पाडण्यात आला. अक्षदा न टाकता फुलांची पुष्पवृष्टी केली. अक्षदासाठी वापरले जाणारे तांदूळची रक्कम इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथ आश्रम यांना अन्नदान म्हणून देण्यात आली. प्रस्तुत विवाहप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न करता त्यांना महामानवांचे कार्य व विचारावर आधारित पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे आहेर न स्वीकारता त्यांची उपस्थिती हाच आमचा आहेर ही भूमिका घेऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण विवाह सोहळ्याचे स्वरूप पूर्णतः भिन्न स्वरूपाचे असून नातेपुते परिसरात हा पहिलाच शिव विवाह सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी, नातेवाईक उपस्थित होते.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन श्री.कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरचे चेअरमन अभिजीत पाटील, माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर, माळशिरसचे मा.नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नातेपुते येथील नगरसेवक अतुल (बापू) पाटील, सुरेंद्र सोरटे, अण्णासाहेब पांढरे, सौ.दिपाली देशमुख तसेच सुचित्रादेवी देशमुख, डॉ..एम.पी.मोरे, मराठा सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेडचे युवा नेते सचिन जगताप, तसेच पिराची कुरोली मधील शिवश्रीबाळासाहेब सदाशिव कौलगे, मा.संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी सा.का. व शिवश्रीपंढरीनाथ सोनबा लामकाने मा.संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना, शिवश्री विलास विष्णू देठे मा.संचालक विठ्ठल सह.साखर का., डाळिंब महाराष्ट्र राज्य डाळिंब संघाचे संचालक शिवश्री भागवत भाऊ पवार, पत्रकार बंधू तसेच पिराची कुरोली व धानोरे परिसरातील सर्व ग्रामस्थ व स्नेह परिवार, नातेपुते येथील ग्रामस्थ, सोलापूर जिल्ह्यातून येणारे सर्व पाहुणे, मित्रपरिवार उपस्थित होते.
हा शिव विवाह सोहळा रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन संपन्न झाला. हा शिवविवाह सोहळा शिवश्री बागल महाराज, गादेगाव यांनी संपन्न केला. या शिवविवाह सोहळ्यामुळे समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.