संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माळशिरस तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतर तालुक्यामध्ये त्वरीत दाखले मिळतात तर माळशिरस मध्येच दाखले मिळण्यास उशीर का? सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लागणारा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उत्पन्नाचा दाखला काढण्याकरिता विद्यार्थ्यांची अक्षरशः हेळसांड होत आहे. अधून मधून आपले सरकार सेवा केंद्राचे सर्व्हर किंवा इंटरनेट डाऊन राहत आहे. महा ई सेवा केंद्रातून दाखले काढून देण्याकरिता सर्वर अधून मधून बंद असल्यामुळे दाखले भरण्यास खूप विलंब होत आहे. त्यामुळे सोडण्यासही विलंब होत आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्याथ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत आणि रात्रभर जागून केंद्र चालकाने दाखले भरले तर तहसिल व प्रांत मधून दाखले सोडण्यास विलंब होत आहे. सर्वच महा-ई-सेवा केंद्रांवर एकसारखी परिस्थिती दिसत आहे.
श्रावण बाळ, संजय गांधी त्याकरिता २१ हजारांच्या उत्पन्न दाखल्याची अट आहे. परंतु मागील काही दिवसांपासून २१ हजाराचे दाखले मिळाले नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे व दिव्यांग व्यक्तींचे हाल होत आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना सुध्दा चालू आहे. त्याकरिता देखील लागणारा उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला काढण्याकरिता महिलांची गर्दी होत असून, दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे महिलांमधून देखील नाराजी पसरली आहे.
एकीकडे शासन नवनविन योजना राबवत आहे तर दुसरीकडे त्यासाठी लागणारी कागदपत्रे वेळेत मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांना त्या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. यातून नागरिकांचे खूप हाल होत आहेत. सध्या दहावी आणि बारावीचे पेपर सुरू असून त्यांना पुढील अॅडमिशनकरिता लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पालकांची सेंटरवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. अजून दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर यापेक्षाही प्रचंड गर्दी होणार असून, भविष्यात खूप मोठे संकट निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिका-यांनी याबाबत लक्ष घालून शैक्षणिक दाखले त्वरीत वितरीत करावे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकातून होत आहे.
शिवसेना नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी लढा उभारत असते. कारण हेच विद्यार्थी भारताचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. भारताचे उज्वल भविष्य याच विद्यार्थ्यांच्या हातात आहे.
तरी माळशिरस तालुक्यातील तहसिदार व प्रांत अधिकारी यांनी शैक्षणिक दाखले त्वरीत वितरीत करावे अशी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख म्हणून आपणास विनंती आहे.....
यावर प्रांताधिकारी पांगरकर मॅडम व तहसीलदार शेजुळ साहेब यांनी आश्वासित केले की निवडणुकीच्या कामामुळे एखादा दिवस वेळ झाला असेल परंतु नोकरीसाठी महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी लागणारे दाखले तात्काळ देण्याची व्यवस्था केली जाईल.
यावेळी माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मेलद्वारे व प्रांत अधिकारी पांगरकर मॅडम व तहसीलदार सुरेश जी शेजुळ साहेब यांना निवेदन दिले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील शहरप्रमुख पोपटराव शिंदे प्रभाग सातचे प्रमुख सनी बरडकर गटनेते दादाभाई मुलानी शामराव लांडगे आदी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.