Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

महाकिड्सचा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण संपन्न

संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

एस.एम.पी. एज्युकेशन सोसायटी नातेपुते संचलित महाकिड्स सी.बी.एस.ई स्कूल फोंडशिरसचा सांस्कृतिक कार्यक्रम युवा नेते जीवनभैय्या उत्तमराव जानकर आणि मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.  जीवनभैय्या जानकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी मुलांना मैदानी खेळ, स्पर्धा परीक्षा, आणि मुलांना सकस आहार कसा देता येईल यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. एक चांगली सुद्रुढ पिढी घडवायची असेल तर मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी  मुलांना मैदानी खेळ, योगा आणि बुद्धिबळ याचे प्रशिक्षण गरजेचे आहे. महाकिड्स ग्रामीण भागातील पालक आणी विद्यार्थ्यांना खेळ आणि सी.बी.एस.ई अभ्यासक्रमाची पर्वणीच देत आहे  त्याचा फायदा पालक आणी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. 

तसेच मामासाहेब पांढरे यांनी संस्थेने कोरोना काळातून उभारी घेत पालकांचा विश्वास जिंकून पुन्हा उभारी घेतली आहे याचे कौतुक केले आणि बक्षिस मिळालेल्या चिमुकल्याना शाबासकी दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.शिवशंकर पांढरे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन सौ.तेजस्विनी पांढरे, सौ.निशाताई सरगर, मेजर सुरेश पांढरे, संदीप कदम, डॉ. सतीश झंजे, श्री.अमोल शिंदे, श्री.सीताराम पांढरे तसेच अँड. रावसाहेब पांढरे आणी सौ.सुवर्णा वारे   उपस्थित होते. 

नूतन संचालक मेजर सुरेश पांढरे यांच्या तर्फे सर्व क्रीडा प्रकारासाठी प्रथम पारितोषक रु.५१/-, द्वितीय २१/- आणि तृतीय ११/- अशी रोख स्वरूपात् बक्षिसे देण्यात आली. तसेच विद्या प्रतिष्ठांनचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. संजय खिलारे सर यांच्या तर्फे स्टुडन्ट ऑफ द इयर ची ट्रॉफी देण्यात आली.

महाकिड्स स्टुडन्ट ऑफ द इयर मास्टर आरुष सुशील गांधी (इ.4 थी), बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर मिस.आरोही सतीश झंजे (इ. 1 ली), मास्टर शिवम भीमराव ठोंबरे (यु.के.जी), अक्षता प्रशांत ढोपे (एल. के.जी), तसेच बेस्ट ग्रँड - पेरेंट्स ऑफ द इयर सौ.बेबिताई व श्री.धनाजी आद्रट, बेस्ट पेरेंट्स ऑफ द इयर  सौ.सीमा व श्री.संदीप कदम आणी सौ.किरण व श्री सुरेश भुजबळ  यांना देण्यात आला.  महा किड्स बेस्ट टीचर ऑफ द इयर मिस. गौरी लक्ष्मन ढोपे यांना देण्यात आला. 

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियाचे दुष्परिणाम, समाजिक, शेतकरी, शैक्षणिक, लोकगीते, शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी यांचा जीवनपट असे सुंदर कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍडमिन रागिणी जाधव, गौरी ढोपे, शुभांगी देशमुख, कोमल रणदिवे, ज्योती बंडगर, साक्षी कुलकर्णी यांनी परिश्रम् घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.औदुंबर बुधावले पाटील यांनी केले.

 बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.


Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...