संपादक: अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
माहिती अशी आहे की, नातेपुते पोलीस ठाणे येथे दि.०६/०२/२०२४ रोजी फिर्यादी नामे. सत्यजित मदन कुमार जोशी रा.नातेपुते यांचे तक्रारून भादवी कलम ३७९ अन्वये अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केले बाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आरोपी उमेश पोपट लोंढे रा.बरड, सातारा यास अटक करून त्यांचेकडून जप्त कऱण्यात आला.
तसेच नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील, बाजार परिसर, इतर ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारीबाबत मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग श्री.नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनखाली नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.महारुद्र परजणे, ASI गडदे, पोलीस कॉन्स्टेबल, ५३२ रणजीत मदने, शिवानंद सोनवणे, संतोष वारे, गणेश कापसे व सायबर सेलचे सचिन राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण करून सायबर सेल सोलापूर यांचे मदतीने आज दि.०६/०३/२०२४ रोजी नातेपुते पोलीस ठाण्याच्या भव्य आवारात चोरी मधील व गहाळ झालेले एकूण १२ मोबाईल Apple सह वेगवेगळया कंपनीचे त्याची एकूण किंमत ०२,९०,४९०/- (दोन लाख नव्वद हजार चारशे नव्वद रुपये) किमतीचा मुद्देमाल मूळ मालकास परत करत त्यांचे स्वागत केले.
त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.