उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागली आहे. २०२४ ची निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा अतिशय महत्वाची आहे. लोकशाही टिकली पाहिजे, हुकूमशाही नष्ट झाली पाहिजे, शेतकरी यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शिकल्या सवरलेल्या मुलांना काम मिळाले पाहिजे यासाठी मी MIDC उभी रहावी, गावाचा तसेच मतदार बांधवाचा विकास व्हावा इत्यादीसाठी माझी उमेदवारी.
२०२४ ची निवडणूक देशासाठी महत्वाची आहे त्यासाठी मतदार बांधवानी जागृत राहवून आपले पवित्र मत दयावे. जनतेची शासन दरबारी न होणारी कामे करून देण्यासाठी मी सक्षम राहील, आरक्षण ज्या समाजाला पाहिजे ते मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी असेल, अशी हि बनवा बनवी करणाऱ्या पार्टीपासून मतदारांनी सावध रहावे. पवित्र मताचे पावित्र राखावे. २०२४ हि निवडणूक रात्र वैऱ्याची आहे असे समजून मतदान करा.
मी सर्व धर्म-समभाव असे समजून राहत आहे. गेली अनेक वर्ष सडेतोड पत्रकारिता करीत आहे, कोणावरही अन्याय होता कामा नये असे माझे मत असते. सध्या आपले पवित्र मत हे लोकशाहीसाठी महत्वाचे आहे. लोकशाही टिकली तरच आपले दिवस चांगले असतील, हुकूमशाही येता कामा नये हे तुमचे मत ठरवते. पार्टीचे नेते येतील, आश्वासने देतील त्यास बळी पडू नका. हि निवडणूक पैसे फेको आणि तमाशा देखो अशी असेल त्यास बळी पडू नका.
माझी सोलापूर राखीव मतदार संघातून उमेदवारी म्हणजे गावाचा व जनतेचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट्ये असेल. सर्व समाज बांधवाना कळकळीची विनंती करतो कि, मला आपले पवित्र मत दयावे, मी गेली सोलापूर राखीव मतदार संघातील फेरफटका मारून अडिअडचणी जाणल्या आहेत, मी गरिबीचे चटके सहन करून उच्च शिक्षण घेतले आहे, जनतेच्या अडिअडचणी माहित आहेत त्या सोडविण्यासाठी मला आपले पवित्र मत देऊन संसदेत पाठवावे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.