सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी जेष्ठ आमदार मा. गणपतराव (आबा) देशमुख |
संपादक
सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी जेष्ठ
आमदार मा. गणपतराव (आबा) देशमुख यांचे निधन झाले. जनतेला अश्रु आणावर झाले. सांगोला
तालुका पाण्याविणा निराधार होता, दुष्काळी होता. त्या तालुक्याला पाणीदार तालुका
करून त्या तालुक्याचे आबांनी नंदनवन केले. आबा हे ५४ वर्षे आमदार होते. आबांचे राहणीमान
साधी व उच्च विचारसरणी होती. लहान थोरांचे आधारस्तंभ,
जनतेसाठी झटणारे सर्व समाजप्रिय लोकसेवक असे होते. शेतकरी,
कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम केले. आबा सारखा नेता यापुढे कधीच होऊ शकणार नाही.
आबांच्या निधनामुळे सर्व समाजप्रिय जनता पोरकी झाली आहे,
त्यांचा आधार गेला आहे. आबांनी कधी गर्व बाळगला नाही. जनतेचा आमदार कसा असावा याचे
उदाहरण म्हणजे गणपतराव (आबा) देशमुख होय. त्यांचे आदर्श कामगिरी जनतेसाठी मौल्यवान
ठरली आहे. त्यांचा आदर्श सर्वच क्षेत्रातील राजकीय असो वा सामाजिक क्षेत्रातील असो.
सर्वांना नवीन दिशा देणारा आहे. सांगोला येथे सूत गिरणी काढून अनेक युवकांना रोजगाराची
संधी मिळवून दिली संसार उभे केले. ओसाड माळरानाचे नंदनवन करण्यासाठी आयुष्यभर आबा झटले.
ते सर्वांचे न्याय दैवत होते. आबांची आठवण जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यंत
जनतेला आठवण राहील. आयुष्यभर जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून कर्तव्य बजावले. आबांना भावपूर्ण
आदरांजली...!
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.