संपादक
समान
नागरी कायदा हा सर्व जाती धर्मासाठी व त्यांच्या रूढी परंपरेसाठी धोकादायक असून सर्व
जाती धर्मावर अन्यायकारक ठरू शकतो. प्रत्येक जाती धर्मामधील असलेले सण,
उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम हे त्या जाती धर्माच्या
नुसार होत असतात. समान नागरी कायदा हा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिकारात करता
येतो परंतु तो करताना असंख्य अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जात धर्म यांना
हा कायदा करावा असे वाटत नाही. प्रत्येक जाती धर्मांना त्यांच्या चालत आलेल्या रूढी
परंपरेने वागावे लागते. प्रत्येक जाती धर्मात वेग वेगळे विवाह सोहळे,
त्या रूढी परंपरेने पाढीत असतात. समान नागरी कायदा जर केंद्र सरकारने व राज्य सरकारने
हुकुमशाही या पद्धतीने वापर करून तो जातीपाती धर्मावर लादला तर राज्य सरकार व केंद्र
सरकारला व त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तसेच केंद्र सरकार
मधील व राज्य सरकार मधील जे कारभारी आहेत त्यांना जाती धर्माच्या व्यक्तींना तो सहन
होणार नाही. समान नागरी कायदा भाजप आणू पाहत असले तरी त्यांना जाती धर्माकडून प्रचंड
विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. समान नागरी कायद्यात प्रत्येक जाती धर्माचे कुटुंब
हे समान असले पाहिजेत या मध्ये भेदभाव, विटाळ, जातीयता, त्या त्या धर्माचे कायदे हे राहणार नाहीत
त्यामुळे हा कायदा जरी सत्येचा वापर समजून केला तरी तो अन्यायकारकच राहणार असे मला
संपादक म्हणून वाटते. समान नागरी कायदा नाव गोंडस व बाळशेदार आहे पण त्यामागचा इतिहास
रक्तरंजीत दिवस असाही होऊ शकतो. समान नागरी कायदा म्हटल्यावर प्रत्येकाला समान शेती,
त्यामध्ये जातपात नाही जे जातींनुसार व धर्मानुसार कायदे आहेत ते या कायद्यामुळे नसणार
नाहीत त्यामुळे अन्याय अत्याचार वाढतील असेही कदाचित घडू शकेल असे वाटते. समान नागरी
कायदा करण्यासाठी कोर्टाचा सहभाग राहणार नाही असेही वाटते. जरी अंतरजातीय विवाह घडून
येत असतील तरी ते कितपत टिकत आहेत हे सांगता येत नाही. या कायद्यामुळे जात जावून एकच
समान धर्म व जात समान राहील का? का जाती अशाच ठेवून मग समान कायदा कसा आणता
येईल हे ही अवघड जागेचे दुखणे असू शकते. हा कायदा केंद्र सरकार व राज्य सरकार आणत असताना
तो कोणाला आवडेल न आवडेल हे सांगता येत नाही जर सत्येचा माज समजून आम्ही सत्ताधारी
असे समजून हा कायदा मंजूर केला तर त्याचा परिणाम सुद्धा वाईट सत्ताधार्यासाठी होऊ
शकतो. जे संविधानाने प्रत्येक जातीधर्मांना न्याय दिला आहे त्यामुळे समान नागरी कायदा
करून जातीय तनाव वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचे कायदे
मोडीत काढणे हे संविधांनाला न जुमानता करणे हे प्रत्येक जाती धर्मांच्या व्यक्तीचा
अपमान, अवहेलना, द्वेष, सूड असे होऊ शकते. समान नागरी कायदा हा सहजासजी
अमलात आणता येणार नाही. निवडणुकी दरम्यान भाजपवाले त्यांच्या अजेंडात समान नागरी कायदा
या बाबत घोषणा असते. घोषणा करणे सोपे आहे पण अमलात आणणे अवघड आहे. तसेच या कायद्यामुळे
अनुसूचीत जाती जमातीच्या कुटुंबावरती प्रचंड अन्याय अत्याचार वाढतील असे घडू शकते.
समान नागरी कायदा म्हणजे प्रत्येकाच्या जाती धर्मावर संकट असू शकते. हा कायदा हिटलरशाही
ने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी त्यांच्या सदस्यांच्या जोरावर केला तर तो प्रत्येक
जाती धर्माच्या बांधवासाठी हानिकारकच होईल. त्यामुळे हा समान नागरी कायदा करताना प्रत्येक
जाती धर्माच्या व्यक्तिकडून मत जाणून घेऊनच तो करावा लागणार आहे त्यामुळे समान नागरी
कायदा होईल की नाही हा येणारा काळच ठरवेल इतकेच.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
✌️
ReplyDelete