Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

समान नागरी कायदा सर्व जातीधर्मासाठी धोक्याचा असू शकतो

संपादक

समान नागरी कायदा हा सर्व जाती धर्मासाठी व त्यांच्या रूढी परंपरेसाठी धोकादायक असून सर्व जाती धर्मावर अन्यायकारक ठरू शकतो. प्रत्येक जाती धर्मामधील असलेले सण, उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम हे त्या जाती धर्माच्या नुसार होत असतात. समान नागरी कायदा हा राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अधिकारात करता येतो परंतु तो करताना असंख्य अडीअडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक जात धर्म यांना हा कायदा करावा असे वाटत नाही. प्रत्येक जाती धर्मांना त्यांच्या चालत आलेल्या रूढी परंपरेने वागावे लागते. प्रत्येक जाती धर्मात वेग वेगळे विवाह सोहळे, त्या रूढी परंपरेने पाढीत असतात. समान नागरी कायदा जर केंद्र सरकारने व राज्य सरकारने हुकुमशाही या पद्धतीने वापर करून तो जातीपाती धर्मावर लादला तर राज्य सरकार व केंद्र सरकारला व त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही तसेच केंद्र सरकार मधील व राज्य सरकार मधील जे कारभारी आहेत त्यांना जाती धर्माच्या व्यक्तींना तो सहन होणार नाही. समान नागरी कायदा भाजप आणू पाहत असले तरी त्यांना जाती धर्माकडून प्रचंड विरोध झाल्याशिवाय राहणार नाही. समान नागरी कायद्यात प्रत्येक जाती धर्माचे कुटुंब हे समान असले पाहिजेत या मध्ये भेदभाव, विटाळ, जातीयता, त्या त्या धर्माचे कायदे हे राहणार नाहीत त्यामुळे हा कायदा जरी सत्येचा वापर समजून केला तरी तो अन्यायकारकच राहणार असे मला संपादक म्हणून वाटते. समान नागरी कायदा नाव गोंडस व बाळशेदार आहे पण त्यामागचा इतिहास रक्तरंजीत दिवस असाही होऊ शकतो. समान नागरी कायदा म्हटल्यावर प्रत्येकाला समान शेती, त्यामध्ये जातपात नाही जे जातींनुसार व धर्मानुसार कायदे आहेत ते या कायद्यामुळे नसणार नाहीत त्यामुळे अन्याय अत्याचार वाढतील असेही कदाचित घडू शकेल असे वाटते. समान नागरी कायदा करण्यासाठी कोर्टाचा सहभाग राहणार नाही असेही वाटते. जरी अंतरजातीय विवाह घडून येत असतील तरी ते कितपत टिकत आहेत हे सांगता येत नाही. या कायद्यामुळे जात जावून एकच समान धर्म व जात समान राहील का? का जाती अशाच ठेवून मग समान कायदा कसा आणता येईल हे ही अवघड जागेचे दुखणे असू शकते. हा कायदा केंद्र सरकार व राज्य सरकार आणत असताना तो कोणाला आवडेल न आवडेल हे सांगता येत नाही जर सत्येचा माज समजून आम्ही सत्ताधारी असे समजून हा कायदा मंजूर केला तर त्याचा परिणाम सुद्धा वाईट सत्ताधार्‍यासाठी होऊ शकतो. जे संविधानाने प्रत्येक जातीधर्मांना न्याय दिला आहे त्यामुळे समान नागरी कायदा करून जातीय तनाव वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचे कायदे मोडीत काढणे हे संविधांनाला न जुमानता करणे हे प्रत्येक जाती धर्मांच्या व्यक्तीचा अपमान, अवहेलना, द्वेष, सूड असे होऊ शकते. समान नागरी कायदा हा सहजासजी अमलात आणता येणार नाही. निवडणुकी दरम्यान भाजपवाले त्यांच्या अजेंडात समान नागरी कायदा या बाबत घोषणा असते. घोषणा करणे सोपे आहे पण अमलात आणणे अवघड आहे. तसेच या कायद्यामुळे अनुसूचीत जाती जमातीच्या कुटुंबावरती प्रचंड अन्याय अत्याचार वाढतील असे घडू शकते. समान नागरी कायदा म्हणजे प्रत्येकाच्या जाती धर्मावर संकट असू शकते. हा कायदा हिटलरशाही ने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी त्यांच्या सदस्यांच्या जोरावर केला तर तो प्रत्येक जाती धर्माच्या बांधवासाठी हानिकारकच होईल. त्यामुळे हा समान नागरी कायदा करताना प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तिकडून मत जाणून घेऊनच तो करावा लागणार आहे त्यामुळे समान नागरी कायदा होईल की नाही हा येणारा काळच ठरवेल इतकेच.   

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...