संपादक
पूरग्रस्थास आपत्ती काळात अथवा
कोणत्याही अपत्य काळात ज्या कुटुंबावर संकट येते, कमविलेले गमविले जाते,
क्षणात होत्याचे नव्हत होत. कुटुंबातील व्यक्ति आपत्तीमुळे जगाचा निरोप घेते
त्यामुळे कुटुंबांना अनंत वेदना होतात त्या वेदनेची तुलनाच होऊ शकत नाही. दु:ख,
वेदना सहन करणे अवघड होते. सध्या कोरोनाचा, राज्यकर्त्याचा,
निसर्गाचा जनतेवर कोप चालू आहे. जनतेला जगणे अवघड झाले आहे. “हरामखोर” राज्यकर्ते
मजेत आहेत, जनतेचे मात्र राज्यकर्त्यांनी हाल,
छळ, सुरू केला आहे. त्यामध्ये निसर्ग सुद्धा जनतेला सोडत
नाही. आधीच रोगाचे संकट आणि त्यामध्ये पुन्हा पुराचे संकट यामुळे गावे,
कुटुंब उध्वस्त झाली आहेत. दिसेनासे झाली आहेत. आपत्तीत माणूस डोळ्या देखत माणस गाडली
गेली आहेत असे असताना समाजसेवी संस्था यांनी पुढाकार घेवून आपत्ती कोसळलेल्या कुटुंबांना
मदत करावी व जे मदत देतात त्यांनी दानशूर दाखवत
असताना नियत स्वच्छ ठेवावी. जुने कपडे, वापरात न येणारी भांडी कुंडी,
कुजलेले कडधान्य व साहित्य असे दानशूर व्यक्तीने देवू नये. त्या मदतीचा त्या आपत्तीतील
कुटुंबांना आधार मिळेल, गरज भासेल असे दान करावे. काम सेवाभावी वृत्तीचे
आणि मदत मात्र टाकाऊ पद्धतीचे असे करू नये. दानशूराने केलेली मदत ही गरज भागेल अशी
करावी. आपत्ती काळातील कुटुंबांना त्या मदतीचा फायदा होईल. दानशूर बांधवांनो आपल्याच
कुटुंबातील व्यक्तीवर संकट आहे असे समजून भरगोस मदत करा. दलाल व्यक्तिपासून सावध रहावे
जेणेकरून आपली आपत्ती कोसळलेल्या त्या कुटुंबापर्यंत मदत पोहचेल हा हेतु ठेवा. राज्य
सरकार असो व केंद्र सरकार असो आपत्ती काळात मदत करताना मतभेद ठेवता कामा नये. त्या
कुटुंबाचे अनमोल मत तुम्हाला मिळाले आहे त्याचा आदर करून त्या आपत्ती कुटुंबांना मदत
करा. टाकाऊ वस्तु देवून दानशूर व्यक्तीने दानशूरपणा दाखवू नये,
त्यांची हेटाळणी करू नये, आपलेचे कुटुंब असे समजून गरज भागेल असे संसार
उपयोगी मदत करा.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.