वाखरी ता.पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त पालखी तळावर दहा मानाच्या पालख्या १९/०७/२०२१ रोजी ०३ वा.पर्यंत पालखी तळावर पोहचून त्या ठिकाणी रीतीरिवाजाप्रमाणे पुजा आरच्या भजन, प्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होऊन वाखरी पालखी तळावरून पंढरपूरकडे दहा मानाच्या महाराजांच्या पादुका घेऊन भजन, कीर्तन करीत पायी जाणार आहेत यासाठी वाखरी पालखी तळावर असलेल्या ३० एकरास तारेचे कुंपण घातले असून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दहा मानाच्या पालख्यांच्यासाठी येणारे वारकरी भक्त आहेत त्या प्रत्येक पालखीसाठी पत्राशेड उभारले आहेत जेणेकरून प्रचंड पाऊस होत असल्यास त्यामध्ये त्या १० मानाच्या पालखी सोबत जे वारकरी व संस्थांचे पदाधिकारी यांना त्या पत्राशेड मध्ये थांबता येईल. तसेच पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने पालखी तळावर स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच वीज,पाणी,औषध फवारणी, रंगरंगोटी केले असल्याचे समजते. ज्या दहा मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर येत असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष उभारला आहे. तसेच पालखी तळाला संपूर्ण तारेचे कंपाऊंड केलेले असून त्यामध्ये बाहेरच्या नागरिकाला प्रवेश बंदी आहे. तसेच वाखरी ग्रामपंचायतनेही पालखी सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी केली आहे. त्यांच्याकडूनही स्वागत केले जाणार आहे. या आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त वाखरी ते पंढरपूर पायी वारी असून कोरोनापासून सावधगिरी बाळगून ही वारी पोलिस बंदोबस्तात पंढरपूर येथे जाणार आहे. पंढरपूर येथे गेल्यानंनातर ते आपआपल्या मठामध्ये जाणार आहेत यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक(ग्रामीण), पंढरपूरचे प्रांत अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, व शासकीय सर्व विभागाचे कर्मचारी या सोहळ्यानिमित्त अहोरात्र झटत आहेत. दहा मानाच्या संतांच्या पादुका एस.टी. बस ने पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहेत.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.