आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर
महाराजांची पालखी नातेपुते ता.माळशिरस येथे पायी वारी असती तर नातेपुते येथे १४ तारखेस
मुक्कामी असते. त्यामुळे नातेपुते पालखी तळावरील विसावा येथे प्रतिकात्मक माउलीच्या
पादुकाची आरती करून आनंद घेतला गेला. नातेपुते येथे पहिला मुक्काम १४ तारखेस झाला असता.
या निमित्ताने नातेपुते येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख दिंडीचे प्रमुख मनोहर भगत
महाराज यांनी विसाव्याच्या जागी स्वच्छता करून त्या कट्ट्याला फुलांची सजावट करून रंग
देवून रांगोळी काढून ज्ञानेश्वर माऊलीच्या सामाधीच्या प्रतिमीचे व ग्रंथाचे पूजन मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी भजनी मंडळ, लक्ष्मी
भजनी मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन केले गेले. हा कार्यक्रम साय. ०६ वा. नातेपुते
पालखी तळावर होऊन या निमित्त माजी आमदार रामहारी रूपनवर, सरपंच
कांचनताई लांडगे, मनोहर भगत, कृषि उत्पन्न
बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी सरपंच अमरसिंह देशमुख, रावसाहेब पांढरे, व माजी सरपंच यांच्या हस्ते आरती करण्यात
आली. यावेळी चंद्रकांत ठोंबरे, विजय उराडे, डॉ.आदिनाथ रूपनवर, गणेश उराडे, डॉ.नरेंद्र कवितके, नारायण काळे, अक्षय भांड, नंदकिशोर धालपे, बंडू
हरणावळ, बाबा बरडकर, विनायक उराडे, श्रीहरी भगत, दादासाहेब लांडगे, पत्रकार, असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.