लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर नातेपुते येथे ४४ व्या शाखेचे उद्घाटनप्रसंगी मान्यवर |
संपादक
नातेपुते ता.माळशिरस,
जि.सोलापूर येथे संस्थापक मा.आ. सुभाष (बापू) देशमुख माजी मंत्री सहकार,
मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित सोलापूर या ४४ व्या शाखेचे उद्घाटन ३०/०७/२०२१ रोजी संस्थापक मा.आ.सुभाष (बापू)
देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळेस माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख,
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज (माऊली) पाटील,
डॉ.एम.पी. मोरे साहेब, भाऊबली चंकेश्वरा साहेब,
सागर बोराटे (महाराज), सहाय्यक निबंधक बी.एस. मिसाळ,
पांडुरंग वाघमोडे, गणेश पागे, सुधीर काळे,
महेश शेटे, अतुल दोशी, पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सौ.अल्का देवडकर,
चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ,
कर्मचारी इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी सागर बोराटे (महाराज) यांनी या पतसंस्थेचे
असलेले कासव चिन्हाबाबत इतिहास सांगितला. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष
बाबाराजे (दादा) देशमुख म्हणाले लोकमंगल पतसंस्थेचे कार्य कौतुकासपद आहे. या पतसंस्थेने
व्यवसायकांना कर्ज देवून त्यांची प्रगती केली. अनेक कुटुंबाचे संसार उभे केले. या पतसंस्थेच्या
माध्यमातून असंख्य सामाजिक कार्य केली गेली. नातेपुते हे गाव सुखासमाधानाने राहणारे
गाव आहे. आदर्श संस्था कशी असावी हे लोकमंगल या पतसंस्थेकडून शिकावे. नातेपुते हे गाव
नात जपणारे आहे असे म्हणाले.
लोकमंगल
नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेचे संस्थापक मा.आ. सुभाष (बापू) देशमुख
उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, नातेपुते येथे सोन्याचे असंख्य दुकाने असल्यामुळे
नातेपुते गाव हे सोन्याचे गाव आहे. प्रत्येक समाजातील सामान्य माणूस उभा राहिला पाहिजे
त्यांची प्रगती झाली पाहिजे. सर्वांना बरोबर घेवून काम करायचे आहे. सहकारामध्ये चढ-उतार
येत असतात. अडी-अडचणी असतात परंतु त्यांना तोंड देत पुढे जायचे असते. या लोकमंगलचे
कासव हे चिन्ह आहे. कितीही संकटे आली तरी कासव मोठ्या हिमतीने समोर जाते. कासव हे ३५०
वर्षे जगू शकते. कोणताही आघात कासव सोसू शकते एवढे त्याच्यामध्ये “बळ” आहे. यावेळी
ठेवीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्जदारांना चेकचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या
प्रमाणात सर्वच क्षेत्रातील असंख्य बांधव उपस्थित होते. नातेपुते येथे लोकमंगल नागरी
सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या शाखेची नातेपुते येथे शाखा असावी यासाठी मा.सुधीर
काळे साहेब, गणेशजी पागे साहेब यांची महत्वाची कामगिरी दिसून आली.
बातमी
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
:
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल,
जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.