Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व


मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व

संपादक 

    वैभव सुरेंद्र शहा रा. नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील असून सर्व धर्म समभाव असा एक दिलदारपणा, आपुलकी, सेवाभावी वृत्ती, दयाळूपणा वैभव सुरेंद्र शहा यांच्याकडे आहे ते लहानथोर असुद्या त्यांना प्रचंड आदर देतात.  वैभवजी यांना संस्काराचे बाळकडू आई वडिलांपासून मिळाले. चांगले करता आले नाहीतर वाईट तरी करू नये ही शिकवण वैभवजी यांना आई वडिलांनी दिली. आपले कर्तव्य समजून रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हे त्यांचे गुण आहेत माणुसकी जपणे हेच कर्तव्य समजून कार्य करीत आहेत. लहानथोरांना आपला मित्र समजून मान देतात. आई वडिलांच्या सोबत राहून इलेक्ट्रॉनिकचे रीपेरिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत असताना एखाद्याचे दुःख वेदना आपत्यकाळ यामध्ये आपले कर्तव्य समजून मदत करतात, धावून जातात हाच मला फार मोठा आनंद वाटतो अशी भूमिका वैभव यांची असते. सर्व बंधुभावाचे कुटुंब हेच आपले कुटुंब समजतात त्यामुळे ते इतरांचे कुटुंब हे आपले कुटुंब समजून मिळून मिसळून राहतात त्यामुळे माणुसकीचे दर्शन वैभवजी कडे आहे. ते विविध ठिकाणी कार्यक्रमात भाग घेऊन कर्तव्य बजावतात त्यामुळे वैभव सुरेंद्र शहा प्रत्येकाच्या मनात कुटुंब वात्सल्य म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा...!

अधिक माहितीसाठी संपर्क 

संपादक - अभिमन्यू  बी.आठवले

९४२०३०२५६१    
                                                                                                                       
उपसंपादक - वैभव अ. आठवले

 साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र

बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

Comments

  1. वैभव शहा यांना शंकर बाबर यांच्या वतीने भावी जीवनासाठी हार्दिक अभिनंदन 💐💐🌹🌹🥀🥀👏👏🌺🌺🌻🌷🌷🌸🌸💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...