संपादक
भारत देशाचा तिरंगा ध्वज हा देशाचा व देशातील जनतेचा अभिमान, स्वाभिमान आहे असे असताना २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व राज्याचे राज्यपाल, पालकमंत्री, सर्व मंत्री, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी ते सरपंच इतर कोणीही यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकवू नये जो राष्ट्रध्वज फडकाविल तो देशाचा दुश्मन समजला जाईल. यापूर्वी ज्यांनी काळी टोपी घालून राष्ट्रध्वज फडकावला त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच एखाद्या सभेच्या वेळी एखाद्या युवकाने काळा शर्ट घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी आला असता त्याठिकाणी त्या युवकाला थांबू देत नाहीत हाकलून देतात मग हा तर देशाचा तिरंगा ध्वज काळी टोपी घालून फडकावणे हा तर मोठा गंभीर गुन्हा आहे.
🙏जनहितार्थ🙏
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment