संपादक
कोरोना covid-19 या रोगाचे आपत्य देशावर व देशातील जनतेवर आले आहे. संचारबंदी, जमावबंदी आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्या व्यक्ती लॉकडाऊन च्या काळात आपल्या गावी येत आहेत परंतु गावातील पुढारी, शासकीय अधिकारी त्यांना जाणूनबुजून कॉरंनटाईन करीत आहेत. त्यांची येताना तपासणी केलेली असते, वरिष्ठ अधिकारी यांचे प्रमाणपत्र असते असे असताना केवळ बाहेरून आल्याचा ठपका ठेऊन गावातील पुढारी राजकारण करून माणुसकी सोडून वागत आहेत ही चिंताजनक बाब आहे अशी परिस्थिती देशात व राज्यात आहे . कॉरंनटाईन करा, काळजी घ्या, त्यांचा अपमान करू नका, त्यांना वेदना होईल असे वागू नका, त्यांचा मानसिक छळ करू नका, छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. कॉरंनटाईन केले आणि एखाद्या व्यक्तीचे बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार पुढारी व अधिकारी असतील. त्यामुळे माणुसकी जपा एवढेच...
🙏जनहितार्थ🙏
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
Comments
Post a Comment