मा. वैभव शहा म्हणजे कुटुंब वात्सल्य नेतृत्व
संपादक
वैभव सुरेंद्र शहा रा. नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील असून सर्व धर्म समभाव असा एक दिलदारपणा, आपुलकी, सेवाभावी वृत्ती, दयाळूपणा वैभव सुरेंद्र शहा यांच्याकडे आहे ते लहानथोर असुद्या त्यांना प्रचंड आदर देतात. वैभवजी यांना संस्काराचे बाळकडू आई वडिलांपासून मिळाले. चांगले करता आले नाहीतर वाईट तरी करू नये ही शिकवण वैभवजी यांना आई वडिलांनी दिली. आपले कर्तव्य समजून रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हे त्यांचे गुण आहेत माणुसकी जपणे हेच कर्तव्य समजून कार्य करीत आहेत. लहानथोरांना आपला मित्र समजून मान देतात. आई वडिलांच्या सोबत राहून इलेक्ट्रॉनिकचे रीपेरिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत असताना एखाद्याचे दुःख वेदना आपत्यकाळ यामध्ये आपले कर्तव्य समजून मदत करतात, धावून जातात हाच मला फार मोठा आनंद वाटतो अशी भूमिका वैभव यांची असते. सर्व बंधुभावाचे कुटुंब हेच आपले कुटुंब समजतात त्यामुळे ते इतरांचे कुटुंब हे आपले कुटुंब समजून मिळून मिसळून राहतात त्यामुळे माणुसकीचे दर्शन वैभवजी कडे आहे. ते विविध ठिकाणी कार्यक्रमात भाग घेऊन कर्तव्य बजावतात त्यामुळे वैभव सुरेंद्र शहा प्रत्येकाच्या मनात कुटुंब वात्सल्य म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहतात. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा...!
अधिक माहितीसाठी संपर्क
संपादक - अभिमन्यू बी.आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक - वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण ,साप्ताहिक बहुजन मित्र
बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार

👌👌👌
ReplyDeleteवैभव शहा यांना शंकर बाबर यांच्या वतीने भावी जीवनासाठी हार्दिक अभिनंदन 💐💐🌹🌹🥀🥀👏👏🌺🌺🌻🌷🌷🌸🌸💐💐
ReplyDelete