Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

भारतातील पहिले मित्र संघटन ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंड्स सर्कल या नोंदणीकृत राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची नियुक्ती

उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र

दि.०४/०३/२०२३ रोजी या संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब व केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी साहेब, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार साहेब या केंद्रीय कार्यकारणी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.ईश्वर हुलवान यांनी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. गणेश गोडसे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.श्रीकांत बाविसकर साहेब यांनी शिफारस केली होती. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण वृत्तपत्राचे, सडेतोड, निर्भीड, जहालवादी, मवाळवादी, विचारवंत संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहेत.  हे "शोधपत्रिका" करीत असून जे दिसेल, जे अनुभवले, जे पाहिले यावरतीच रोखठोक लिहीत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक, राजकीय पक्षात काम केले आहे. त्यांची ही स्वत:ची बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना आहे. अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी सदैव जागरूक असतात. या AJFC संघटनेत यापूर्वीही चांगले काम केले आहे. अभ्यासूवृत्तीने अधिकारी यांनी घाम फोडत असतात. त्यांचा अॅट्रोसिटी अॅक्ट, माहिती अधिकार कायदा, सरकारी कामात अडथळा कायदा, दफ्तर दिरंगाई कायदा यावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधान पदापर्यंतची कर्तव्य काय असतात त्याचाही अभ्यास आहे. "अन्याय करणार्‍यांचा ते कर्दनकाळ" म्हणून ही त्यांची ओळख आहे. ते उच्च शिक्षित, निर्व्यसनी, असंख्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. प्रत्येकाचा आदर करणारे व्यक्तिमत्त्व आहे. जो पर्यंत शांत तो पर्यंत शांत, एकदा सटकली की परत माघारी घेत नाहीत. हा त्यांचा गुण आहे. संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार अधिकार व हक्क यासाठी जनतेसाठी झटत आहेत. "संघर्ष आणि झुंज" त्यांच्यासाठी मौल्यवान ठरत आहे. भारतातील पहिले मित्र संघटन म्हणजे ऑल जर्नालिस्ट अॅण्ड  फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आठवले यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातून विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर लहान थोर यांच्याकडून यांचे कौतुक होत आहे. तसेच आठवले म्हणाले की, माझ्यावरती वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडेन, त्या जबाबदारीला कुठेही तडा जाऊ देणार नाही. ही पत्रकार संघटना सोलापूर जिल्ह्यात नावारूपाला आणेन. पत्रकार व जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या संघटनेचा उपयोग करेन. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क 

संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले 

९४२०३०२५६१
 उपसंपादक : वैभव अ. आठवले 
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...