उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील असलेले ग्रामीण रुग्णालय हे बेवारीस असे होत चालले होते. त्या रुग्णालयात थांबू वाटत नव्हते. प्रचंड दुर्गंधी, परिसर अस्वच्छ, कर्मचारी यांचा मनमानी कारभार अशी प्रचंड बिकट अवस्था होती. या रुग्णालयात रक्त तपासण्यासाठी यंत्र सुविधा नव्हत्या. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी रुग्णालयास सेल काउंटरवर, ऑटो लायजर या दोन मशिन रक्त तपासणीसाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयास देण्यात आल्या त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाने रुग्णालयास व्हेंटिलेटरसह सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका देण्यात आली. त्यासाठी माळशिरस तालुका प्रमुख मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील शिवसेना (बाळासाहेबांची) यांनी पाठपुरावा केला होता त्यास यश आले व रुग्णवाहिका नातेपुते रुग्णालयास मिळाली. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, पंचायत समिति सदस्य माऊली पाटील, अॅड.बी.वाय.राऊत, नगरसेवक रावसाहेब पांढरे, रणजीत पांढरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील, डॉक्टर नरेंद्र कवितके, फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, हनुमंत शिंदे, सतीश बरडकर, समीर शेख, मनोज जाधव, पोपट शिंदे इ. उपस्थित होते.
तसेच राजकुमार हिवरकर-पाटील यांनी नातेपुते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपये मंजूर करून आणले. ते करीत असलेली कामगिरी लोकाभिमुख होत आहे. नातेपुते ग्रामीण रुग्णालयाची अवस्था गंभीर होते. रुग्णांना उपचार घेण्यासाठी जावू वाटत नव्हते. परंतु राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे नातेपुते रुग्णालय देखणे व सुसज्ज झाले आहे. रुग्णालयाचा कायापालट केला आहे. रुग्णालयाला चकाकी आली आहे. जनतेला व रुग्णांना आता आपला दवाखाना वाटू लागला आहे. आरोग्याच्या दृष्टीकोणातून मुली व महिलांच्या विविध समस्यांवर उपक्रम राबवून तपासणी केली जाते व उपचारावर तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाते असे विविध उपक्रम हिवरकर-पाटील राबवत आहेत. पश्चिम भागाला लाभलेले जनतेसाठी झटणारे खरे समाजसेवक अशी जंतेतून बोलले जाते. मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे नातेपुते ग्रामीण रुग्णालयास सोयीसुविधा मिळवून देत असल्यामुळे नातेपुते ग्रामीण रुग्णालय देखणे व सुसज्ज असे झाले आहे.
नातेपुते ग्रामीण रुग्णालयास मा.राजकुमार हिवरकर-पाटील शिवसेना (बाळासाहेब) यांच्याकडून ऊर्जित अवस्था प्राप्त
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१