उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
मिळालेल्या माहितीनुसार तसेच प्रत्यक्ष आलेल्या अनुभवानुसार नातेपुते येथे असलेल्या ज्या शासकीय बँका आहेत त्या बँकेतील कर्मचारी यांचा उद्धटपणा, आरेरावी करणे, दमात घेणे असे करीत असून ग्राहकांना सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून दमदाटी करीत आहेत. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू म्हणून भीती दाखवत आहेत असे चाललेले आहे. ग्राहकांना सेवा देण्यापेक्षा मानसिक त्रास देण्यात नातेपुते शासकीय बँकेतील कर्मचारी आनंद मानत आहेत. ग्राहकांना वेदना देण्याचे काम शासकीय बँकेतील कर्मचारी, मॅनेजर करीत आहेत.
बसायला फिरती खुर्ची, थंडगार हवा, प्रचंड पगार यामुळे या कर्मचारी यांना माज चढला आहे. ग्राहक वेळ, पैसा, मानसिक त्रास सहन करून येत असतात. बँकेत ठेवलेला पैशाचा ग्राहक हा मालक आहे. कर्मचारी नोकर आहेत, त्यांनी नोकराप्रमाणे रहावे. बँकेत नोकर म्हणून काम करता, बँकेचा मालक नाही हे कर्मचारी, मॅनेजर यांनी लक्षात घ्यावे. नातेपुते शासकीय बँकेतील कर्मचारी हे कामचुकार असून त्या कर्मचार्या यांच्याबाबत व बँकेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रकार संघटना तक्रार करणार आहे.
नातेपुते येथील पथसंस्था व त्यांचे संस्थापक, संचालक व कर्मचारी ग्राहकांना मान-सन्मान देतात, त्यांचा आदर करतात. परंतु शासकीय बँकेतील कर्मचारी ग्राहकांना नाहक त्रास देतात. मीटिंग म्हणून रूममध्ये वडापाव खात ग्राहकांना ताटकळत ठेवत आहेत असे असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत. नातेपुते येथील शासकीय बँकेतील हे कर्मचारी जास्त करून हिंदी बोलणारे आहेत, हिंदी भाषेचा आम्ही आदर करतो पण शासकीय बँकेत मराठी भाषा बोलणारेच कर्मचारी, मॅनेजर असायला हवेत. शासकीय बँकेतील कर्मचारी यांनी ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, आदर करावा, अडचण असल्यास समजावून सांगावे असे कर्तव्य पाळावीत परंतु कामचुकार कर्मचारी मॅनेजर करतात मात्र ग्राहकांना वेठीस धरतात.
तसेच सरकारी कामात अडथळा या कायद्याचा आधार घेवून ग्राहकांना दम देतात ही नासकी मनुवृत्ती नातेपुते शासकीय बँकेतील कर्मचारी, मॅनेजर यांनी सोडावी नाहीतर दफ्तर दिरंगाई कायदा काय सांगतो हे मला समजावून सांगावे लागेल असे ऑल इंडिया जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.