उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
भारतातील पहिले नोंदणीकृत पत्रकार संघटना म्हणजे ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल (AJFC) ही संघटना आहे. या संघटनेची नुकतीच नातेपुते येथे २२/०३/२०२३ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत AJFC चे सर्व पदाधिकारी यांनी एकमताने माळशिरस तालुका ऑल इंडिया जर्नालिस्ट अॅड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सौ.शोभाताई वाघमोडे यांची निवड केली. ही निवड सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी.आठवले यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवडीला संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब, केंद्रीय कार्यकारणी, तसेच राज्य कार्यकारणी यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. या संघटनेने महिलेला तालुका अध्यक्ष करून आदर व सन्मान केला. शोभाताई वाघमोडे या तरुण भारत व इतर वृत्तपत्रातून पत्रकारिता करीत असून अन्यायाला वाचा फोडत आहेत. ही संघटना पत्रकारांसाठी "वरदान" ठरत आहे. पत्रकार, संपदकांच्या पाठीशी ही संघटना उभी राहत आहे.
अभिमन्यु आठवले यांच्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदाच्या कलावधीमधील जिल्ह्यातील पहिली माळशिरस तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील संपादक, पत्रकार या संघटनेत सक्रिय होत आहेत. ही संघटना पत्रकारांसाठी आशेचे किरण वाटत आहे. ही संघटना पत्रकार व जनता यांना आधार वाटत आहे. या संघटनेने सोलापूर जिल्ह्यात चांगली घौडदौड सुरू केली आहे. ही संघटना नावारूपाला येत आहे. या संघटनेचे AJFC नाव झाले आहे. अभिमन्यु आठवले यांची संघटन कौशल्य ही संघटना मजबूत करण्यासाठी सार्थ ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्ष व कार्यकारणी करून पत्रकारांना बळ देणार आहेत. समाजकंटकाने अन्याय केल्यास ही पत्रकार संघटना त्या पत्रकाराच्या पाठीशी उभी राहून अन्याय करणार्या समाजकंटकाचा हिशोब चुकता करेल. ही संघटना पत्रकारासाठी कवच ठरणार आहे. या संघटनेत कोणत्याही दैनिक, मासिक, पाक्षिक, वार्षिक, साप्ताहिक, चॅनेलचे संपादक पत्रकार इ.ना सामावून घेतले जाणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा. ९४२०३०२५६१
माळशिरस तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे.
सौ.शोभाताई वाघमोडे (माळशिरस तालुका अध्यक्ष),
श्री.बाळासाहेब कदम (माळशिरस तालुका उपाध्यक्ष पूर्व भाग),
श्री.श्रीराम भगत (माळशिरस तालुका उपाध्यक्ष पश्चिम भाग),
श्री.विलास भोसले (माळशिरस तालुका कार्याध्यक्ष),
श्री.हनुमंत माने (माळशिरस तालुका सचिव),
श्री.धनंजय पवार (माळशिरस तालुका संघटक),
श्री.उमेश पोतदार (माळशिरस तालुका सहसचिव),
श्री.आबा भिसे (माळशिरस तालुका सहसंघटक),
श्री.अमोल साठे (सदस्य),
श्री.बशीर शेख (सदस्य),
श्री.संजय पवार (सदस्य),
श्री.मनोज राऊत (सदस्य),
श्री.गोरख साळवे (सदस्य),
श्री.अॅड. नंदकुमार पिसे (सदस्य),
श्री.विवेक राऊत (सदस्य)
इ.च्या निवडी जिल्हाध्यक्ष अभिमन्यु आठवले व राज्यउपाध्यक्ष श्रीकांत बाविसकर यांच्या उपस्थितीत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.