उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
अलीकडच्या काळात अधिकारी यांना "साहेब" म्हणताना लाज वाटते. अर्जदार आपले प्रश्न, अडीअडचणी सोडविल्या जाव्यात त्या त्या विभागाचे जे अधिकारी असतात त्या त्या अधिकार्याकडे अर्जदार अर्ज देतात, कर्मचारी पोच देतात पण त्या अर्जाचे निवारण करून त्याचवेळी न्याय देताना अधिकारी दिसत नाहीत हे मी संपादक म्हणून अनुभवले आहे, पाहिले आहे. अर्जदाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. अर्जदाराचा पैसा, वेळ वाया घालवून अधिकारी यांच्याकडे अर्जदार अर्ज देतो, जेणेकरून अधिकारी न्याय देतील परंतु अर्जदाराच्या वाट्याला संकट, शिमगा येताना दिसते. अधिकारी यांनी तातडीने अर्जदाराने दिलेल्या अर्जाचे निवारण करून त्याबाबत निर्णय तसेच मार्गदर्शन केले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.
अधिकारी यांनी आलेल्या अर्जदाराच्या अर्जाचे निवारण करून "लायक" म्हणून नाव कमवावे "नालायक" म्हणून नको. "खुर्ची आणि पद" याला शोभेल असा न्याय निवाडा करावा. अर्जदाराने दिलेला अर्ज त्यामधील विषय याबाबत गुंतागुंतीचा विषय असेल तर अर्जदाराने काय करावे यासाठी अधिकारी यांनी मार्गदर्शन, सल्ला दिला पाहिजे, जेणेकरून अर्जदार समाधानी होईल अधिकारी यांना अर्जदार साहेब म्हणतो पण तोच साहेब "हरामखोर" निघतो हे मी पाहिले आहे.
अर्जदाराने दिलेला अर्ज हा FIR असाच असू शकतो त्यामुळे त्याची अधिकारी यांनी दखल घेतलीच पाहिजे. दफ्तर दिरंगाई, टाळाटाळ, बनवाबनवी केली गेली नाही पाहिजे. अधिकारी यांनी लायक समजून त्या पदावर काम करता त्यावेळी जनतेच्या अर्जाचे निवारण केले गेले पाहिजे ही कर्तव्यता जपली पाहिजे. एक तर अधिकारी यांच्या ऑफिसचा सदैव दरवाजा बंद असतो, अधिकारी काळा की गोरा, चांगला की वाईट जनतेला समजत नाही ही भयानक अत्यंत वाईट बाब आहे. डोक्यावरती फॅन, बसायला फिरती खुर्ची, भरमसाठ पगार, येण्याजाण्यासाठी शासकीय वाहने, दारात दरवाजा उघडण्यासाठी कर्मचारी इ. सुखसोयी असतात त्यामुळे अधिकारी यांना "माज" चढतो परंतु माज उतरायला सुद्धा अर्जदार कमी पडणार नाहीत. "सरकारी कामात अडथळा" या कायद्याचा आधार अधिकारी घेतात हे मी पाहिले आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार निवारण केले का? म्हणून अधिकारी यांना जाब विचारला तर अर्जदाराचे चुकले काय? अर्जदाराने विचारू नये काय? असे अनेक प्रश्न अर्जदारापुढे उभे राहतात.
ज्यावेळी अर्जदार यांना संताप येतो त्यावेळी अर्जदाराने अधिकारी यांच्या थोबाडीत मारली तर गुन्हा काय? कुठे केला? यासाठी अधिकारी यांनी अर्जदाराने दिलेल्या अर्जाची दखल घेवून निवारण करावे, न्याय देण्याचा प्रयत्न करावा, गुंतागुंतीचा वाद विवादाचा प्रश्न असेल तर त्या अर्जदाराला मार्गदर्शन करावे एवढे जरी अधिकारी यांनी केले तर तो अधिकारी अर्जदाराच्या मनामध्ये लायक ठरेल नाहीतर नालायक म्हणून त्याची लायकी कळेल. अधिकारी यांनी पदाचा अभिमान बाळगून जनतेचे असलेले प्रश्न, अडिअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध रहावे. अधिकारी आणि जनता असे नाते जपावे. अधिकारी यांनी जनतेचा सेवक समजावे, मालक समजू नये याची दक्षता घ्यावी असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क