गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी.
संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे.
संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही.
त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे.
१) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे.
२) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील.
३) तसेच संविधान भवन बांधण्यासाठी गाव पातळीवरील बौद्ध समाजाच्या लोकांची लोकसंख्या प्रमाणपत्र (२०११) च्या जनगणणेनुसार जोडणे आवश्यक आहे.
४) त्याचप्रमाणे संविधान भवन बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडून निर्धारित केलेल्या बौद्ध समाजासाठी राखीव जागेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
५) तसेच यासाठी पदवीधर किंवा त्यापेक्षाही जास्त शिक्षण पात्र बौद्ध समाजातील व्यक्तीची व महिलांची संविधान भवन देखभाल व विनियोग समिति स्थापन करण्यात यावी.
६) त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने विनियोग समिति स्थापन करण्याकरिता ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक आहे त्यानुसार समिति स्थापन होईल.
७) तसेच देखभाल व विनियोग समितीचे अध्यक्ष हे बौद्ध जातीचे उच्च शिक्षित व्यक्ति महिला असेल.
८) त्याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य संविधान भवनात सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये ग्रंथालय, डाटा एंट्री, साफसफाई, वीजपुरवठा इतर यानुसार लोकांची नेमणूक केली जाणार आहे.
९) समितीपूर्ण बौद्ध समाजाची असले पाहिजे व उच्च शिक्षित व्यक्ति असावी.
१०) जागेचा नकाशा असा असला पाहिजे - त्याचप्रमाणे नमूना नं.८ चा उतारा ग्रामसेवक यांच्या सही व शिक्क्यांनी असला पाहिजे तो प्रस्तावास जोडणे.
११) तसेच प्रस्तावावर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य संविधान भवन देखभाल समितीचे अध्यक्ष व इतर व्यक्तींची सही त्या प्रस्तावावर असायला हवी.
१२) प्रस्ताव दाखल करत असताना बौद्ध समाजातील व्यक्तींनी एक प्रत आपल्याकडे राखून ठेवावी. तसेच चार प्रती काढून त्या ग्रामपंचायतमध्ये ठेवाव्यात व त्या प्रतिवर OC घ्यावी. तसेच २ प्रती गटविकास अधिकारी पंचायत समितिकडे देण्यात यावेत व त्यावर OC घेण्यात यावी ही कागदपत्रे सर्व पुरावा म्हणून राहतील.
तरी सर्व बांधवांनी संविधान भवन बौद्ध समाजात होण्यासाठी त्वरित पाठपुरावा करावा.
यासाठी समाजात जनजागृती व्हावी याहेतूने प्रसिद्धीद्वारे अभिमन्यु बी.आठवले यांनी केले आहे.
संकलन जनहितार्थ