संपादक साप्ताहिक बहुजन भूषण
दिनांक ०५/०३/२०२१ शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजलेपासून ज्या
अर्जदारांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांच्याकडे सन २०१७ मध्ये अपील दाखल
केले होते त्या अपिलाची सुनावणी आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी पार पडली. त्या सुनावणीत जनराज्य माहिती
अधिकारी, अपिलीय अधिकारी यांनी माहिती मागितलेल्या अर्जदारांना माहिती न दिल्यामुळे
व अपील अधिकाऱ्यांनी अपील आदेश न काढल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे सन
२०१७ रोजी अपील केले होते त्या अपिलाची सुनावणी आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. हा एक
चांगला योग आला.
आयोगाच्या समोरासमोर जनराज्य माहिती अधिकारी, अपील अधिकारी,
अर्जदार व राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे आयुक्त यांनी सुनावणी घेतली. त्यामुळे
अर्जदारांच्या अर्जाला वाचा फुटली आहे, अर्जदारांना आनंद वाटला आहे. माहिती देताना
राज्य माहिती अधिकारी यांनी टाळाटाळ करू नये, दप्तर दिरंगाई करू नये, असे चालणार
नाही व अपील अधिकारी यांनाही अपील घेताना टाळाटाळ व दप्तर दिरंगाई करता येणार नाही या आजच्या सुनावणीने दाखवून दिले.
त्याचप्रमाणे आज अर्जदारांनी व्यक्तिशा मागितलेली
माहिती व्यक्तिशा दिली जावी, व्यक्तिशा दिलेली माहिती पोस्टाने पाठवून देऊ नये
असेही आयोगाचे म्हणणे बरे वाटले. आज या माहिती अधिकाऱ्याच्या सुनावणीमुळे
अर्जदाराच्या अर्जाला न्याय मिळाला असे होताना दिसले. मी अभिमन्यू बी. आठवले संपादक
पत्रकार व संघटनेचा संस्थापक या नात्याने एका ग्रामसेवकाकडे माहिती मागितली परंतु
ती मला मिळाली नाही व अपिलाचा आदेश ही मिळाला नाही. त्यामुळे मी आयोगाकडे अर्ज दाखल
केला त्यामुळे आयोगाने माहिती देण्यास जनराज्य माहिती अधिकारी यांना सांगितले.
बघूया आता जनराज्य माहिती अधिकारी मला माहिती देतो का.
आज राज्य माहिती आयोग खंडपीठ
पुणे आयुक्तांनी सुनावणी घेतली त्यामुळे खूप अर्जदारांना आनंद वाटला. अर्जदारांनी
दिलेल्या जनराज्य माहिती अधिकारी यांना यापुढे माहिती देणे बंधनकारक आहे, लपवाछपवी
करता येणार नाही. तसे केल्यास जनराज्य माहिती अधिकारी यांच्यावरती आयोग शिस्तभंगाची
कारवाई करतील. आजच्या या सुनावणीने अर्जदार जोमात तर अधिकारी कोमात गेल्याचे समजले
आहे खूप बरे वाटले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ.
अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण,
साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.