उपसंपादक - बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्याच्या काळात समाजकंटकाकडून दादागिरी केली जाते, धमकावले जाते, त्यांना मनाला लाज वाटेल अशा पद्धतीने त्यांना अपमानित केले जाते, बदनामी केले जाते, जीवे मारण्याचा कट रचला जातो. तसेच शासकीय जागेत, गावठाणात काही संपादक, पत्रकार राहत असताना त्यांना गाव सोडून जाण्यास ग्रामपंचायत व इतर पालिकेमधील जातिवादी पदाधिकारी यांचेकडून अन्याय होताना दिसत आहे. पत्रकार हा खरा समाजसेवक आहे. घडणार्या घडामोडी जनतेसमोर मांडतो, पत्रकारांमुळेच घडणार्या घटनांनाची माहिती जनतेला मिळते. पत्रकारावर जीव घेणे हल्ले होताना दिसत आहे. त्यामुळे पत्रकारांवर अन्याय कराल तर यापुढे त्या समाजकंटकाला 50,000/- (पन्नास हजार रुपये) दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास होणार, पत्रकारासाठी ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पत्रकाराच्या वाट्याला यापुढे कोणीही जाणार नाही. संपादक पत्रकाराला धमकावल्यास २४ तासात अटक केली जाते व लवकर जामीन हल्लेखोराला मिळणार नाही. पत्रकार संकटात असेल तर संपर्क साधून त्वरित मदत जनतेने व शासकीय यंत्रणेने केली पाहिजे. पत्रकाराला मान सन्मान दिला गेला पाहिजे, त्यांचा आदर केला गेला पाहिजे, त्यांना आदराने बोलले पाहिजे. संपादक पत्रकारांना "डिवचाल तर त्याची किंमत समाजकंटकांना मोजावी लागेल."
तसेच पत्रकाराबरोबर पोलिस कर्मचारी यांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावरती FIR नोंदविला जाईल. तसेच पोलिस अधिक्षकावरती सुद्धा कारवाई केली जाईल. जमावामध्ये पत्रकार रिपोर्टिंग करताना तो जमावाचा भाग होत नाही असे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली आहे.
तसेच कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलिस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलिस गर्दीला हटवू शकतात तशी वागणूक पत्रकारांना देवू शकत नाहीत, तसे केल्यास पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. गर्दी असो वा सार्वजनिक ठिकाण त्यांच्या कामापासून पत्रकारांना रोकने हे माध्यमांच्या स्वतंत्र्यावर गदा आणणारे आहे असे प्रेस कौन्सिल ने देशाचे कॅबिनेट, सचिव, गृहसचिव, मुख्यमंत्री, मुख्यसचिव व सर्व राज्यांच्या गृहसचिवांना सूचना पाठविल्या आहेत.
पत्रकारासोबत पोलिस किंवा निमलष्करी दलाकडून हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. पत्रकारासोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल, जे घटनेच्या कलम 194 मध्ये देण्यात आले आहे. या कलमानुसार पोलिस अथवा अधिकारी व पत्रकारांवर हल्ले करणारा, दमदाटी करणारा, छळ करणारा यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले