उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार आर. जी. रूपनवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील यांच्या सहमतीने लोगो(अॕप)सोहळा संपन्न झाला. मोबाईल(अॕप) माजी आमदार आर.जी. रुपनवर यांच्या हस्ते व QR कोड सोहळा बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रस्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन ॲड रणवीर देशमुख म्हणाले की, "नातेपुते गावामध्ये सध्या नऊ ते दहा पतसंस्था आहेत. आम्ही सर्व तरुण मंडळीनी सह्याद्री पतसंस्था स्थापन केली. आदरणीय समाजभुषण कै.नानासाहेब देशमुख यांनी रेणुका बँक, डाॕ.बा.ज. दाते प्रशाला यासारख्या संस्था स्थापन केल्या व त्या पारदर्शकपणे चालवल्या हाच वारसा पुढे घेऊन त्याच वाटेन आम्ही वाटचाल करु या संस्थेमध्ये मोबाईल अॕप्लीकेशन आहे, QR कोड आहे. घरबसल्या सर्व व्यवहार करता आले पाहीजे असे सांगितले.
माजी आमदार आर.जी. रुपनवर म्हणाले की," लोकांच्या गरजा भागवण्याचे काम आजच्या पतसंस्था करतात नातेपुतेमध्ये पतसंस्थेने फार मोठा विश्वास निर्माण केला आहे. पतसंस्था म्हणजे पैसा वाटप करण्यासाठी नाही तर त्यातून संघटन निर्माण होते. या संस्थेचा नावलौकिक झाला पाहिजे. आम्ही सर्वजन त्यांना मदत करू. आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील म्हणाले की," गेली पन्नास-साठ वर्षे आपल्या तालुक्याची जडनघडन सहकारातुन झाली आहे. सहकाराला टिकवण्याचे काम धनाजी व रणवीर ही तरुण पिढी करत आहे. १३ वर्षे सत्तेपासुन लांब होतो, हा सगळा बॕकलाॕक भरुन काढायचा आहे. बाजारपेठेच्या गावामध्ये शौचालय असले पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करायची आहे, दादांच्या वतीने सर्व संचालक मंडळ यांना शुभेच्छा देतो असे म्हणाले.
जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की," १९८६ साली रेणुका पतसंस्थेचे उदघाटन विजयसिंह(दादा) मोहीते-पाटील यांनी केले होते. ८०% नातेपुते या गावाच्या पतसंस्थेला मान्यता देण्याचे काम आदरणीय दादांनी केले. या गावामध्ये राजकारण बाजुला ठेवून पतसंस्था एकमेकांना मदत करतात. पतसंस्था चालवताना टिम वर्क अतिशय चांगले असले पाहीजे असे सांगितले.
डॉ.एम.पी. मोरे साहेब यांनीही आपल्या मनोगतात बँकेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील, माजी आमदार आर.जी. रुपनवर, माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, डाॕ.एम.पी. मोरे, ॲड. डी.एन. काळे, अर्जुन जठार, रेणुका पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महेश शेटे, उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, माजी सरपंच अमरशिल देशमुख, नाथाजी(तात्या)देशमुख, बाहुबली चंकेश्वरा, शरद मोरे, राजेश चंकेश्वरा, भैय्यासाहेब देशमुख, डाॕ विठ्ठल कवितके, ॲड शिवाजी पिसाळ, ज्येष्ठ नगरसेवक ॲड.बी.वाय.राऊत, बांधकाम सभापती अतुल पाटील, नगरसेवक दादासाहेब उराडे, रणजित पांढरे, अण्णा पांढरे, रावसाहेब पांढरे, अविनाश दोशी, अतुल बावकर, बाळासाहेब काळे, संतोष काळे, सह्याद्री बँकेचे संस्थापक धनाजी(बापु)देशमुख, चेअरमन ॲड.रणवीर देशमुख, व्हाईस चेअरमन डाॕ.तेजस चंकेश्वरा इ. सर्व संचालक, सेक्रेटरी व सेवकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार औदुंबर बुधावले(सर) यांनी केले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.