उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र
सध्याच्या काळात संपादक पत्रकार वंचित आहेत. ना त्यांना पगार, ना त्यांना दररोज भत्ता, जाहिरातीच्या कमिशनवर घर परपंचा चालवावा लागतो. कोणतेही शासकीय योजना पत्रकारांना मिळत नाही. पत्रकारांना बँका जवळ करीत नाहीत अशी अवस्था पत्रकार संपादक यांची आहे, पत्रकारिता ही अग्नी परीक्षा आहे. संपादकापुढे पेपर चालविण्यासाठी आर्थिक अडचणी आहेत, तर पत्रकारापुढे कसे जगायचे हा प्रश्न आहे. संपादक पत्रकार यांना कोणाचाही आधार नाही. पत्रकारिता करीत असताना समाजकंटकाकडून चटके बसत असतात. पत्रकाराला संपविण्यापर्यंत सध्या समाजकंटकाची मजल गेली आहे. पत्रकारासारखी अवस्था कोणाची नाही. पत्रकारांना जीव मुठीत धरून घडणार्या घटना उजेडात आणण्याचे पवित्र काम करतो. पत्रकारामुळेच अन्यायाला वाचा फुटते. पत्रकारांना बळ देणारी भारतातील एकमेव संघटना म्हणजे AJFC संघटना आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष नेमले जाणार आहेत. सभासद करून घेतले जाणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रिक मीडिया, दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक इ. वृत्तपत्राचे संपादक पत्रकारांना या संघटनेमध्ये सहभाग करून घ्यायचा आहे. त्यासाठी इच्छुक संपादक पत्रकार यांनी 9420302561 या मोबाईल नं. वरती संपर्क साधावा. तसेच सर्वच पत्रकार हे श्रीमंत अथवा माध्यम घराणेशाहीचे नसतात. अत्यंत बिकट परिस्थितीतील सुद्धा पत्रकार आहेत. तसेच काही पत्रकार शासकीय जागेत राहत आहेत परंतु ती जागा त्यांच्या नावावर नाही असेही असंख्य संपादक पत्रकार आहेत त्यासाठी ही संघटना वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून राहत असलेली जागा नावावर करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. पत्रकार जनतेचा आधार आहे. पत्रकार हे कोणाचेही दुश्मन नसतात, ते मित्र असतात. सोलापूर जिल्ह्यातील ज्या त्या तालुक्यातील पदाधिकारी नेमून त्या तालुक्यातील पत्रकारांना भेडसावणार्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे. AJFC ही संघटना संपादक पत्रकारासाठी वरदान ठरणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील संपादक पत्रकार यांनी सहभाग नोंदवून एक भाग व्हावा. संपादक पत्रकार या नात्याने जनतेचे हित पाहता मग पत्रकारांवर संकट आल्यास तुमचा आधार कोण? तसेच भविष्यात AJFC या संघटनेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय असलेल्या कमिट्या यामध्ये संपादक पत्रकारांना घेण्यात यावे यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे. या निवडी संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब तसेच केंद्रीय कार्यकरणी, राज्य कार्यकरणी यांचे आदेशानुसार करण्यात येणार आहेत असे AJFC संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष अभिमन्यु बी.आठवले यांनी प्रसिद्धीद्वारे केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले