उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील गणेश मल्हारी घुले यांनी 26/01/2023 पासून आयडीबीआय बँक शाखा नातेपुते मॅनेजर विरोधात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. उपोषण सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत असे म्हणाले. तसेच बँक मॅनेजर यांनी 10 ते 11 महीने कर्ज प्रकरण मंजूर करण्यास वेळ लावला, माझी दिशाभूल केलेली आहे. मी खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 25 लाख रुपये व्यवसाय कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी ट्रेनिंग हे केले व प्रकरण मंजूर ही झाले, ते प्रकरण नातेपुते आयडीबीआय बँक शाखा नातेपुते यांच्याकडे पाठविले. माझ्या प्रकरणाची दखल घेतली नाही, दिशाभूल केली, दफ्तर दिरंगाई कायद्याचा अवमान केला गेला यामुळे मानसिक त्रास झाला आहे. वेळ व जाण्यायेण्यासाठी पैसाही खर्च झाला आहे. कर्ज प्रकरण त्वरित मंजूर व्हावे यासाठी 11/11/2021 रोजी मुंबई मंत्रालय येथे समक्ष जावून मुख्यमंत्री कार्यालयात माझी व्यथा वेदना मांडली व प्रकरण मंजूर करण्यात यावे असे मी दिलेल्या अर्जावर नमूद केले व मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज ही आला परंतु दखल घेतली नाही. बँकेत...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे