सोलापूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पंचवीस हजार कार्यकर्ते दसरा मेळावा यासाठी मुंबई येथे जाणार : जिल्हाप्रमुख चरणराज (दादा) चवरे
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील शंकरराव कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची दसरा मेळावा यासंदर्भात बैठक पार पडली. मोठे बाजारपेठेचे असलेले नातेपुते हे गाव व पश्चिम भागातील तसेच आजूबाजूच्या गावातील असंख्य कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश जिल्हा अध्यक्ष चरणराज (दादा) चवरे यांच्या उपस्थिती केला. एकनाथ शिंदे गटाला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभलेले चरणराज चवरे म्हणजे तळागाळातून काबाड कष्ट करून सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणीच्या वेथा-वेदना समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देणारे एक तडफदार व्यक्तिमत्व म्हणून शिवसेना शिंदे गटाला जिल्हाध्यक्ष लाभले आहेत. मनमिळावू व्यक्तिमत्त्व, पदाचा गर्व नाही. पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. चवरे यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष पदाधिकारी शिंदे गटाला मिळाला आहे. मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे बैठकीसाठी आले होते. त्यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नातेपुते या नगरीत मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या रूपाने माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला एक झुंज देणारे सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात ठसा उमठविलेले नेतृत्व मिळाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे जनतेची अडलेली कामे त्वरित मार्गी लावणारे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २५,०००/- हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत असेही जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासाठी बसेस केल्या आहेत. सोलापूर जिल्हाभर मा.श्री.जिल्हाध्यक्ष चवरे व त्यांचे पदाधिकारी गाव, शहर, तालुका यामध्ये गावभेटी घेण्यासाठी जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबई येथे ऐतिहासिक झाला पाहिजे. मुंबई येथील बिकेसी मैदान भरगच्च भरले जावे यासाठी धडपडीत आहेत. यावेळी जिल्हा उपप्रमुख, नगरसेवक संतोष आबा वाघमोडे, माळशिरस तालुका अध्यक्ष राजाभाऊ हिवरकर-पाटील, माळशिरस तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ, अकलुज शहर अध्यक्ष महेश पवार, नातेपुते शहर अध्यक्ष समीर शेख, नगरसेवक जगन्नाथ गेजगे, दादा मुलाणी, पोपट शिंदे, साजिद आतार, सागर मिसाळ, अक्षय मिसाळ, पेनूरचे सरपंच सुजीत आवारे, बापूराव शिरसागर इत्यादि असंख्य कार्यकर्ते या बैठकीस हजर होते.
बातमी
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी.
आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक
: वैभव अ. आठवले
साप्ताहिक
बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले
परिवार
टीप
: जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment