Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुते नगरपंचायतचा विकासात्मक लेखाजोखा

उपसंपादक

            ०३ ऑगस्ट २०२१ रोजी नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. निवडणुका लागल्या, निकाल लागले आणि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी नगरसेवक यांनी पदभार स्वीकारला. त्वरित सर्व प्रभागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये रस्ते, पानी, ड्रेनेज इ.ची पाहणी केली. ०९ मार्चच्या मासिकी मीटिंगमध्ये ०१ ते १७ प्रभागातील कामे मंजूर करून घेण्यात आली. सध्या २२ दिवस पाणी पुरेल एवढा साठा असून तो साठा वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यासाठी ०५ कोटी रुपयांची गरज आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे. १७ प्रभागात विविध कामाच्या निधीसाठी डी.पी.डी.सी. प्रस्ताव पाठवले आहेत. सध्या निधी मिळाला नसल्यामुळे थोडी अडचण येत आहे परंतु ती लवकरच सुटेल. सर्वांच्या मदतीने नातेपुते नगरपंचायतचा कायापालट होऊन एक विकासाचे नातेपुते गाव होईल असे नगराध्यक्ष सौ.उत्कर्षाराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे(आबासाहेब) देशमुख, सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल(बापू)पाटील यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच गावातील बरीच संपत्तीची नोंद नव्हते त्याचा सर्व्हे करण्यासाठी एजन्सी नेमली आहे. पाणी सर्वांना मिळावे यासाठी २ मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. सध्या नगरपंचायतमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी उपलब्ध आहेत. इतर केडरची पदे नाहीत. ती भरण्याबाबत आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली आहे. नातेपुते येथील परवतेश्वर मंदिरासाठी  ०२ कोटीची मागणी आहे. तसेच बाजारतळा शेजारील तळ्याचा विकास करण्यासाठी ०५ कोटी रुपयेची मागणी केली आहे. ०४.५० कोटी रुपये आमदार राम सातपुते यांनी तर आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी निधी दिला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे निधी आणण्यासाठी अडचण येत आहे. तसेच रमामाता नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व अभ्यासिका तर ४५ फाटा येथील अंडर ग्राऊंड फुटपाथ करण्यात येणार आहे. तसेच पालखी तळावर विकासात्मक कामे करणार आहेत. तसेच बाजार कट्ट्यांवर पत्रा शेड उभारले जाणार आहे. डी.पी.डी.सी.तून निधी मिळाला असता तर गावात सर्व प्रभागात कामे होत असताना जनतेला दिसले असते. तरीही आम्ही निधि आणून सर्व प्रभागातील जनतेची कामे करून विकासात्मक नातेपुते बनवले जाईल असे पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजी(आबासाहेब) देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल (बापू) पाटील, पंचायत समिति सदस्य ज्ञानराज (माऊली) पाटील, कृषि उत्पन्नबाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरसेवक आण्णा पांढरे, सुरेंद्र सोरटे, माजी ग्रा.प.स.बाळासाहेब काळे, माजी ग्रा.प.स.अॅड. रणवीर देशमुख, शक्ती पलंगे उपस्थित होते.      

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

                                                                    ९४२०३०२५६१        

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

आठवले परिवार

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...