पंढरपूर : बहुजन भूषण वृत्तपत्र
माहितीनुसार वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंचपदी धनश्री तानाजी साळुंखे यांची निवड झाली आहे. काही महिन्यापूर्वीच पती तानाजी अभिमान साळुंखे यांचे निधन झाले आहे. पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत व त्या सरपंच व्हाव्यात अशी पतीची इच्छा होती. त्यामुळे काळजावर दगड ठेवून पत्नीने पतीचे सरपंच होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. मागील दीड वर्ष कविता पोरे या सरपंच होत्या ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ०१/०९/२०२२ रोजी वाखरी ग्रामपंचायतमध्ये विशेष सदस्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये धनश्री तानाजी साळुंखे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच पदासाठी धनश्री तानाजी साळुंखे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची सरपंचपदी निवड झाली. यावेळी उपसरपंच सोमनाथ पोरे, मावळत्या सरपंच कविता पोरे, माजी उपसरपंच संग्राम गायकवाड, सर्व सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी सुखदेव शिंदे तसेच पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे, माजी पंचायत समिति सदस्य नानासाहेब गोसावी, इब्राहीम मुजावर, संजय अभंगराव, अभिमान साळुंखे, मच्छिंद्र सलगर, सुभाष सुरवसे, ज्योतीराम पोरे, क्लार्क जितेंद्र(नाना) पोरे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :
मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ.
आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.