डॉ.वैभव विठ्ठल कवितके |
उपसंपादक : वैभव आठवले
नातेपुते
ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील डॉ.वैभव विठ्ठल कवितके यांनी नातेपुते शहरातील
रस्ते दुरुस्त करावेत म्हणून नातेपुते नगरपंचायतच्या मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब
यांना मोर्चा काढून निवेदन दिले आहे. पंढरपूर-पुणे ते नातेपुते पोलिस स्टेशनकडे जाणारा
रस्ता उखडून गेला आहे. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या रस्त्यावर सतत वरदळ असते. लहान
मुले,
महिला,
पुरुष,
वयोवृद्ध व्यक्ति ये जा करीत असतात. या रस्त्यावर महादेव मंदिर,
बाजारतळ, पोलिस स्टेशन आहे. हा रस्ता बाजारतळाला लागून आहे. लहान मोठी
वाहने या रस्त्याने सतत ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. जनतेला
जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या रस्त्याचे सेमेंट कॉंक्रेटीकरण करण्यात यावी अशी
मागणी डॉ.वैभव कवितके व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. जनतेसाठी ज्या सुविधा पाहिजेत
त्यासाठी नगरपंचायतला जागे करण्याचे काम डॉ.वैभव कवितके करीत आहेत. व्यवसायाने वैभव
कवितके डॉक्टर आहेत. त्यांचा नातेपुते येथे मोठा दवाखाना आहे. जनतेच्या वेदना काय असतात
त्यावर उपचार कसे केले पाहिजे त्याचे ज्ञान डॉक्टरांना आहे. सत्ता असेल तरच कामे होतात
असे नाही. एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाठपुरावा करणे ही जबाबदारी समजून ते काम करीत
आहेत. डॉक्टर वैभव कवितके हे नातेपुते नगरपंचायत मध्ये उमेदवार म्हणून उभे होते परंतु
त्यांचा पराभव झाला असला तरी जनतेच्या हितासाठी सर्व धर्म समभाव यामधील जनतेची कामे
करण्यासाठी धडपडीत आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पराभव झाला म्हणून खचून न जाता तो मोठ्या मनाने मान्य करायचा आणि जेवढे जनतेच्या हितासाठी
करता येईल तेवढे करायचे हेच डॉक्टरांचे ध्येय आहे. नातेपुते गावात ज्या अडचणी आहेत
त्या सोडवण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची ठरत आहे. त्यांनी हा रस्ता सीमेंट कॉंक्रेट
रस्ता होण्यासाठी उठवलेला आवाज जनतेसाठी फायदेशीर ठरेल.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय
उद्दीष्ट आहे.